NIA कडे तपास द्या सांगणाऱ्यांच्या मनात काळंबेरं असेल -उद्धव ठाकरे

मुंबई तक

• 11:10 AM • 08 Mar 2021

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणाता तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने NIA कडे सोपवला आहे. महाराष्ट्र एटीएसकडून हा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणावर बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. त्यांच्या मनात काहीतरी काळंबेरं असेल यासाठी हा तपास NIA कडे सोपवण्यात आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र […]

Mumbaitak
follow google news

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणाता तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने NIA कडे सोपवला आहे. महाराष्ट्र एटीएसकडून हा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणावर बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. त्यांच्या मनात काहीतरी काळंबेरं असेल यासाठी हा तपास NIA कडे सोपवण्यात आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी या प्रकरणाचा चांगला तपास करत होते. त्यामुळे राज्य सरकार करत असलेल्या तपासातून आम्हीही या प्रकरणाचा सखोळ तपास करु असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर देत होते. यावेळी बोलत असताना ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सिल्वासाचे खासदार मोहन डेलकर यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणावरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. डेलकर यांनी लिहीलेल्या चिठ्ठीत कोणत्या अधिकाऱ्याची नावं आहेत याचा महाराष्ट्रातले पोलीस तपास करतील. सातवेळा निवडून आलेल्या एका खासदाराला अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करावी वाटत असेल तर हे केंद्राचं अपयश असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाचा तपास मुंबईत योग्य पद्धतीने होईल अशी खात्री डेलकर यांच्या कुटुंबियांना आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कारवाई करु असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

“मिथुन चक्रवर्तींना भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी पक्षात घेतलं”

दरम्यान मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा महाराष्ट्र एटीएसने तपास सुरु केला असून हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जवाबावरुन अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी एटीएसने १० पथकं स्थापन केली असून हिरेन यांच्या मोबाईलचं लोकेशन ज्या मांडवी भागात सापडलं तिकडेही एक पथक तपास करत आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाच्या तपासावरुन केंद्र आणि राज्य सरकार पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp