पहिल्यांदाच लैंगिक संबंध ठेवल्यावर महिलांमध्ये होऊ शकतात ‘हे’ 5 मोठे बदल

मुंबई तक

08 Nov 2023 (अपडेटेड: 09 Nov 2023, 02:58 PM)

changes in body after sex: पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. जे शारीरिक आणि मानसिक दोन्ही असू शकतात.

these 5 changes can happen in womens body after being intimate for the first time

these 5 changes can happen in womens body after being intimate for the first time

follow google news

Sex Health Tips: प्रत्येक व्यक्तीसाठी पहिल्यांदा लैंगिक संबंध करणं हा रोमांच आणि भावनांनी भरलेला क्षण असू शकतो. पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्याआधी आपण जितके घाबरलेलो असतो त्यापेक्षा आपण कदाचित आयुष्यात कधीच चिंताग्रस्त नसतो. पण आज आम्ही तुम्हाला फर्स्ट टाईम सेक्सशी संबंधित काही माहिती देणार आहोत. पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवल्यानंतर अचानक आपल्या शरीरात काही बदल दिसू लागतात. ज्यामुळे आपल्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. (these 5 changes can happen in womens body after being intimate for the first time)

हे वाचलं का?

जरी हे खरे आहे की, प्रथमच लैंगिक संबंध ठेवल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे बदल होऊ शकतात, परंतु काही सामान्य बदल आहेत जे तुम्हाला माहित असले पाहिजेत. विशेषत: महिलांमध्ये अधिक बदल होत असतात.

1. वेदना जाणवू शकतात

पहिल्यांदा सेक्स करताना तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील, ज्याची अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये हायमेनचे स्ट्रेचिंग, योनीमार्गाचे स्नायू घट्ट होणे, या सर्व कारणांचा समावेश आहे. याशिवाय, तुमच्या दुखण्याचं कारण म्हणजे सेक्सबद्दल तुमचा जास्त विचार हे देखील असू शकतं. याशिवाय, कधीकधी पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवल्यावर ऑर्गेजममुळे गर्भाशयात क्रॅम्प्स येऊ लागतात, त्यामुळे खूप वेदना होतात.

2. होऊ शकतं स्पॉटिंग

पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर योनीतून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. मात्र तसे न होण्याचीही दाट शक्यता आहे. या दोन्ही परिस्थिती सामान्य आहेत. जर तुम्हाला पहिल्यांदा सेक्स करताना रक्तस्त्राव झाला तर हे हायमेन तुटण्याचे कारण असू शकते. हायमेन हा योनीच्या आतील त्वचेचा एक पातळ पडदा आहे. जो लैंगिक संबंधादरम्यान ताण पडल्याने फाटतो, ज्यामुळे रक्तस्त्राव होतो. पण, हायमेन सहजपणे ताणू शकतो आणि सेक्समुळेच तो तुटतो हेएकमेव कारण नाही. अनेक प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये हायमेन देखील तुटतो. त्याच्या तोडण्याचा तुमच्या कौमार्याशी काहीही संबंध नाही.

हे ही वाचा>> Physical Relationship: ‘या’ 5 कारणांमुळे महिला सेक्ससाठी करतात टाळाटाळ

3. लघवी करताना जळजळ होणे

पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवल्यानंतर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल तर ही एक सामान्य प्रक्रिया आहे. योनीमार्ग आणि मूत्रमार्ग शरीरात अगदी जवळ असल्यामुळे योनीमार्गावर दाब पडल्यामुळे मूत्रमार्गात वेदनांसोबत जळजळ होऊ शकते. परंतु ही जळजळ सलग 4-5 दिवस राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

4. गुप्तांगाला येऊ शकते खाज

जर योनीमध्ये खाज येत असेल तर ते सामान्य आहे. पण ही खाज असह्य होत असेल तर त्यामागे कंडोम हे कारण असू शकते. तुम्हाला अनेक प्रकारच्या कंडोमची ऍलर्जी असू शकते ज्यामुळे खाज येते. असं असल्यास आपण तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हे ही वाचा>> Sex Health Tips: महिलांसाठी नियमित सेक्स चांगलं?, ‘या’ 10 गोष्टी समजून घ्या!

5. वाढू शकतो स्तनाग्र आणि क्लिटॉरिसचा आकार

क्लिटॉरिसवर स्तनाग्रांच्या अनेक नसा येऊन संपतात. याचे कारण असे की जेव्हा सेक्ससाठी उत्तेजित होतात तेव्हा स्तनाग्रांचा आकार बदलतो. यासोबतच स्तनाच्या ऊतींनाही सूज येऊ लागते. ज्यामुळे स्तन मोठे दिसू लागतात. याशिवाय, जेव्हा लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होता, तेव्हा स्तनाग्र पूर्वीपेक्षा घट्ट होतात. तथापि, संभोगानंतर ते सामान्य आकारात परत येतात.

हा लेख सामान्य माहितीसाठी आहे. प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी असते त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या शरीरात होणारे बदलही वेगवेगळे असू शकतात. तुम्हाला तुमच्या शरीरात काही असामान्य बदल जाणवल्यास, विलंब न करता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

    follow whatsapp