याला म्हणातात Instant Karma ! दागिने चोरुन बाहेर पळणारा चोर अडकला भिंतीच्या होलमध्ये

मुंबई तक

• 11:18 AM • 06 Apr 2022

कलियुगात आपण केलेल्या कृत्याची फळं इथेच भोगायची असताता असं म्हटलं जातं. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात याचा पुरेपूर प्रत्यय आला आहे. ज्यात एका मंदिरात दागिने चोरुन भिंतीच्या होलमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात चोर तिकडेच अडकला. तिथून बाहेर पडता येत नसल्यामुळे अखेरीस त्याला मदतीसाठी हाका माराव्या लागल्या आणि अखेरीस त्याची चोरी आपोआप सर्वांच्या समोर आली. श्रीकाकुलम जिल्ह्यातील जामी […]

Mumbaitak
follow google news

कलियुगात आपण केलेल्या कृत्याची फळं इथेच भोगायची असताता असं म्हटलं जातं. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात याचा पुरेपूर प्रत्यय आला आहे. ज्यात एका मंदिरात दागिने चोरुन भिंतीच्या होलमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात चोर तिकडेच अडकला.

हे वाचलं का?

तिथून बाहेर पडता येत नसल्यामुळे अखेरीस त्याला मदतीसाठी हाका माराव्या लागल्या आणि अखेरीस त्याची चोरी आपोआप सर्वांच्या समोर आली. श्रीकाकुलम जिल्ह्यातील जामी येल्लम्मा मंदिरातील दागिने हा चोरचा चोरुन पळत होता. पापा राव असं या चोराचं नाव असून त्याने मंदिराती खिडकी तोडून आत प्रवेश करत मूर्तीच्या अंगावरील सर्व दागिने चोरले.

परंतू पळून जात असताना तो एका भितींतील होलमध्ये अडकल्यामुळे त्याचा संपूर्ण डाव फसला. चोराने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर या चोराला या होलमधून बाहेर काढत पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आलं.

    follow whatsapp