राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासाठी मैदानात उतरल्याचं पाहण्यास मिळाले. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा काही प्रश्न येत नाही. आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही राजीनाम्याचं ट्विट मागे घ्यावं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही सगळेच करतो आहोत. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असाही आरोप अजित पवार यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?
तो व्हीडिओ पाहिला तर कळतं की मुख्यमंत्री कारमध्ये बसले आहेत. त्यांच्या कारपासून दहा फुटांवर जितेंद्र आव्हाडांवर जो आरोप केले जात आहेत ती घडली आहे. हा विनयभंग आहे. विरोधकांचा प्रयत्न अशा प्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे असं अजित पवार आहे. जी व्यक्ती मुख्यमंत्री पदी बसली आहे त्यांच्या पाठिशी १४५ आमदार असतील तोपर्यंतच ती व्यक्ती त्या पदावर असते हे कुणी विसरू नये असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगायला हवं होतं की..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या सगळ्यावर हे सांगायला पाहिजे होतं की हा विनयभंगाचा प्रकार नाही. मुंब्रा भागात छटपूजेचा कार्यक्रम होता. त्यावेळी ज्यांनी आरोप केला त्यांचा उल्लेख बहेनजी असा करण्यात आला होता. मी आज जितेंद्र आव्हाड यांना भेटायला आलो आहे. माझ्या कुठल्याही सहकाऱ्यावर असा अन्याय झाला असता तरी मी आलोच असतो. आज मी आव्हाड यांच्यासोबत चर्चा केली. याआधीही मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे त्यात मारहाण झालेली व्यक्ती सांगत होती की मी आव्हाडांमुळे वाचलो त्या प्रकरणातही जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. आता जसाजसा वेळ जाईल तसं यामागे सूत्रधार कोण आहे हे समजेल. अशा प्रकारची षडयंत्रं रचून शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात रचली जात असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे.
आपण कायदे कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून करत असतो. पण कायद्याचा वापर करून कुणावर अन्याय होत असेल तर ते पण बरोबर नाही. हा सगळा प्रकार एक षडयंत्र आहे असं आमचं मत आहे. आम्ही १५ वर्षे लागोपाठ सत्तेत होतो. जयंत पाटील, छगन भुजबळ आणि आर. आर. पाटील यांच्याकडेच गृहमंत्रालय होतं. आमच्या सरकारने कधीही सूडाचं राजकारण केलं नाही. या खात्याचा गैरवापर कुणीही केला नाही.
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जनता पाहते आहे की विनयभंग झालेला नसताना लोकप्रतिनिधीला अडकवलं जातं आहे हे काही योग्य नाही. आम्ही लोकांशी संबंध ठेवून असतो. सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करत असतो. हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. या परंपरेला तिलांजली देण्याचं काम आज चाललेलं आहे हे घातक आणि चुकीचं आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे जण जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिशी आहोत. अन्यायाशी मुकाबला करायचा असेल तर जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायला नको. लोकशाही आणि संविधान टिकलं पाहिजे हाच आमचा हेतू आहे. राज्यातल्या कुठल्याही महिलेवर, बहिणीवर, आईवर किंवा कोणत्याही मुलीवर अन्याय होऊ नये याची जाणीव आम्हाला आहे. मात्र आम्हाला अडचणीत आणण्यासाठी अशा प्रकारे गोवलं जात असेल तर ते चुकीचं आहे. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. पोलिसांनीही कुणाच्या दबावाला न घाबरता आपलं काम केलं पाहिजे.
ADVERTISEMENT