या सीझनमध्ये कौन बनेगा करोडपतीमध्ये आजवर न पाहिलेल्या गोष्टी पाहायला मिळाल्या. अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये पहिल्यांदाच एका स्पर्धकाने तज्ज्ञामुळे जिंकलेली रक्कम गमावली आहे. दिवित भार्गव याला हा फटका बसला आहे. प्राप्ती शर्मानंतर कर्नाटकातून आलेल्या दिवित भार्गवला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. पण, भार्गव या शोमधून 6 लाख रुपये जिंकू शकला नाही.
ADVERTISEMENT
एक्सपर्टचा सल्ला पडला भारी
कोण बनेगा करोडपती या क्विझ शोमधील स्पर्धक नेहमीच द्विधा मनस्थितीत असतात. त्यांच्या मदतीसाठी तज्ज्ञ तिथे उपस्थित असतात. गेल्या काही वर्षांत, शोमधील अनेक स्पर्धकांनी तज्ञांच्या मदतीने लाखो रुपये जिंकले आहेत. पण हे पहिल्यांदाच घडलं, जेव्हा स्पर्धकाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप महागात पडलं. 10 वर्षांचा दिवित भार्गव शोमध्ये चांगला खेळत होता. खेळात तो पुढे सरकत होता. मात्र 6,40,000 च्या प्रश्नावर खेळ थांबला. दिवितला या प्रश्नाचे उत्तर येत नव्हते. म्हणून त्याने एक्सपर्टचा सल्ला घेतला.
प्रश्न होता ,कोणत्या क्षेत्रात पती-पत्नीच्या जोडीला संयुक्तपणे नोबेल पारितोषिक मिळालेले नाही? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एक्सपर्ट सृजन पाल सिंग यांना शोमध्ये बोलावण्यात आले होते. भार्गवने तज्ज्ञाच्या मदतीने 6 लाख रुपये जिंकतील अशी आशा व्यक्त केली. पण सृजन पाल सिंगचे उत्तर चुकीचे निघाले. यानंतर भार्गव शोमधून केवळ 3 लाख 20 हजार रुपये जिंकू शकला.
अमिताभ बच्चानना पण बसला धक्का
सृजन पाल सिंह यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे. याशिवाय ते शास्त्रज्ञ आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडून चुकीची उत्तर अपेक्षित नव्हतं. शो संपल्यानंतरही अमिताभ बच्चन म्हणाले की, मी पहिल्यांदा पाहिलंय, जेव्हा एका तज्ज्ञाने चुकीचं उत्तर दिलं आहे. हा एपिसोड खरंच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारा होता. पण ते म्हणतात की सर्वकाही आयुष्यात पहिल्यांदाच घडते. कौन बनेगा करोडपतीमध्ये काय घडल, ज्याचा कुणी विचारही केला नव्हता.
ADVERTISEMENT