तब्बल ३७ वर्षांपासून माधुरी दीक्षितची ही सिरीयल आहे अजनूही डबाबंद, चक्क दूरदर्शनने नाकारली होती माधुरीची सिरीयल..

मुंबई तक

• 06:32 AM • 15 May 2021

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा आज ५४ वा वाढदिवस. आजही माधुरी दीक्षित लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. मात्र लाखो दिलों की धडकन असलेल्या माधुरीला एकेकाळी चक्क दूरदर्शननेच नाकारलं होतं. माधुरीची प्रमुख भूमिका असलेली सिरीयल प्रक्षेपित करण्यासाठी चक्क दूरदर्शननेच नकार दिल्याने ही सिरीयल गेली ३७ वर्ष डब्यातच पडून आहे. आजही ही सिरीयल कुठेच प्रक्षेपित झालेली नाही.. हा […]

Mumbaitak
follow google news

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा आज ५४ वा वाढदिवस. आजही माधुरी दीक्षित लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. मात्र लाखो दिलों की धडकन असलेल्या माधुरीला एकेकाळी चक्क दूरदर्शननेच नाकारलं होतं. माधुरीची प्रमुख भूमिका असलेली सिरीयल प्रक्षेपित करण्यासाठी चक्क दूरदर्शननेच नकार दिल्याने ही सिरीयल गेली ३७ वर्ष डब्यातच पडून आहे. आजही ही सिरीयल कुठेच प्रक्षेपित झालेली नाही..

हे वाचलं का?

हा किस्सा १९८४ सालचा आहे. माधुरी दीक्षित हे नावही तेव्हा कोणाला परिचयाचं नव्हतं.आणि माधुरी दीक्षितनेही बॉलिवूडमध्ये आपले पाय तोपर्यंत रोवले नव्हते. ते दूरदर्शनचं युग होतं. दूरदर्शनवर त्याकाळात एकाहून एक सरस अश्या टीव्ही सिरीयल्य येत होत्या. आणि प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर या टीव्ही सिरीयल्स आवडीने पाहत होते. त्याकाळात दिग्दर्शक अनिल तेजानी यांनी बॉम्बे मेरी है या सिरीयलची निर्मिती केली होती. आणि या सिरीयलमध्ये माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका होती. या सिरीयलमधून माधुरी टीव्ही विश्वात डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली होती. या सिरीयलचा पहिला एपिसोडही चित्रितही करण्यात आला होता.

बॉम्बे मेरी है या सिरीयलचा पहिला एपिसोड चित्रित केल्यानंतर दिग्दर्शक अनिल तेजानी यांनी हा एपिसोड प्रसारित करण्याच्या परवानगीसाठी दूरदर्शनकडे पाठवला. मात्र दूरदर्शनने बॉम्बे मेरी है ही सिरीयल दूरदर्शनवरून प्रसारित करण्यासाठी नकार दिला. अनिल तेजानी यांनी याबाबत दूरदर्शनला विचारणा केली असता, तुमच्या सिरीयलमध्ये कोणीही प्रसिद्ध कलाकार नाही असं त्यांना सांगण्यात आले. त्याकाळात सिरीयल प्रसारित करण्यासाठी दूरदर्शनशिवाय कोणतीही वाहिनी नव्हती. त्यामुळे दस्तुरखुद्द माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत असलेली मालिका डबाबंद झाली. नंतर काही कारणांमुळे ही मालिका कधीच प्रसारित झाली नाही.

गेली ३७ वर्ष ही मालिका कोणत्याही वाहिनीवरून कधीच प्रसारित झाली नाही. त्यामुळे माधुरी दीक्षितचं १९८४ सालीच टीव्हीवरून डेब्यू करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. माधुरी दीक्षितसोबत अभिनेते बेंजामिन गिलानी यांचीही या सिरीयलमध्ये महत्वाची भूमिका होती. मात्र माधुरी आणि बेंजामिन गिलानी यांची ही जोडी आणि बॉम्बे मेरी है ही सिरीयलही कधीच छोट्या पडद्यावर झळकली नाही.

    follow whatsapp