ADVERTISEMENT
काश्मिरी पंडितांच्या नरसंहार आणि त्यांच्यावर 1990 साली झालेले अत्याचार या सगळ्याची कहाणी सांगणारा ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाची देश-विदेशात बरीच चर्चा रंगली आहे.
या सिनेमाबाबत देशात बराच वादही रंगला होता. आता पुन्हा एकदा या सिनेमावरुन वाद निर्माण झाला आहे.
सिंगापूरमध्ये या सिनेमा बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सिंगापूरच्या सिटी-स्टेटच्या गाइडलाइन्सचं उल्लंघन करणारा आहे.
यामध्ये मुस्लिमांबाबत एकतर्फी बाजू दाखविण्यात आली असून त्याने काही जणांना चिथावणी मिळू शकते आणि त्यातून तिथे संघर्ष होऊ शकतो असं तेथील सरकारचं म्हणणं आहे. शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT