मार्च महिन्यापासून संपूर्ण राज्यभरात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पार गेला आहे. पुढील दोन महिन्यांत परिस्थिती काहीप्रमाणात अशीच राहील असा अंदाज वर्तवला जात आहे. वाढत्या उन्हाच्या झळाळीचा त्रास लोकांना होत असतानाच मुक्या जनावरांनाही या उन्हाचा त्रास सोसावा लागत आहे.
ADVERTISEMENT
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात एक वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी एका माकडाला आपल्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी पाजून त्याची तहान शमवताना दिसत आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचा असल्याचं कळतंय. वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी संजय घुडे हे मुरबाड भागातून जात असताना त्यांना हे माकड दिसलं. या माकडाला त्यांनी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी प्यायला देत त्याची तहान भागवली.
प्रत्येक मुक्या प्राण्यावर प्रेम करुन त्याला संकटातून वाचवणं यालाच माणुसकी असं म्हणतात. सध्याच्या उन्हात माणसांप्रमाणे पशु-पक्षी यांनाही फटका बसत आहे. अशा परिस्थितीत संजय घुडे यांनी माकडाला पाणी पाजत त्याची तहान भागवल्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
ADVERTISEMENT