गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा राधे हा सिनेमा चर्चेत आहे. मे महिन्यात हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. तर आज या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सलमान खान जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये दिसून येतोय.
ADVERTISEMENT
सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून ‘राधे’चा ट्रेलर शेअर केला आहे. राधे सिनेमाचा 2 मिनिट 51 सेकंदाचा आहे. ट्रेलरची सुरुवात मुंबई शहरातून सुरू होतेय. यामध्ये ड्रग्ज आणि गुन्हेगारी वेगाने वाढत असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यानंतर शहरात गुन्हेगारी वाढवणार्या रणदीप हूडाची एन्ट्री होते. ‘राधे’ म्हणजे सलमान खानला या गुन्ह्याला आळा घालण्यासाठीचं काम देण्यात आलेलं आहे.
चित्रपटामध्ये सलमानबरोबर अभिनेत्री दिशा पाटणी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रभुदेवा दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
ADVERTISEMENT