पुण्याच्या हडपसर भागातील हिंगणे मळा भागात असलेल्या एका कॅनॉलमध्ये पडून अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्रिशाका असं या मुलीचं नाव आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी सकाळी विजय खुडे हे पत्नी शिवानी आणि दोन मुलांना रिक्षातून घेऊन हिंगणे मळा जवळ असलेल्या कॅनॉलमध्ये कपडे धुण्यासाठी आले होते. तेव्हा विजय आणि शिवानी हे दोघे जण कपडे धुण्यासाठी पाण्यात उतरले, तर चार वर्षांचा रुद्र आणि अडीच वर्षाची त्रिशाका रिक्षाच्या बाजूला खेळत बसले होते. ही दोन्ही मुलं खेळत असताना आई-वडीलांना काहीही कळायच्या आत अडीच वर्षांती त्रिशाका पाण्यात पडली.
यानंतर तिच्या आई-वडिलांना या गोष्टीबद्दलची माहिती कळलीच नाही. आपलं काम झाल्यानंतर विजय आणि शिवानी वर आले असता त्यांनी आपल्या मुलाला त्रिशाका कुठे आहे असं विचारलं असता त्याने हिंगणे मळाच्या दिशेने बोट दाखवलं. यानंतर आई-वडीलांनी शोध घेतल्यानंतरही त्रिशाका सापडली नाही.
हिंगोली : अल्पवयीन मुलीला बिस्कीटाचं आमिष दाखवून विनयभंग, आरोपी फरार
ज्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली असता खेळता-खेळता त्रिशाका त्यांना पाण्यात पडल्याचं एका सीसीटीव्हीमध्ये दिसलं. ज्यानंतर पोलिसांनी तपास केला असता तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या यवत येथे त्यांना त्रिशाकाचा मृतदेह सापडला.
वाशिम : विहीरीचा भाग खचून २ मजुरांचा मृत्यू, १ जखमी
ADVERTISEMENT