इंदोर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळ्याजवळ घसरले!

मुंबई तक

• 04:32 AM • 27 Sep 2021

इंदोर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. हा अपघात आज (27 सप्टेंबर) सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडला आहे. रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अपघातमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

इंदोर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे.

हा अपघात आज (27 सप्टेंबर) सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अपघातमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे.

लोणावळा रेल्वे स्थानकात येताना हा प्रकार घडला असल्याने तात्काळ यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून डब्बे रुळावर घेण्याचे काम सुरु झाले आहे.

दरम्यान, लवकरच येथील रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत होईल असं संबंधित प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

    follow whatsapp