मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या मन्नत निवासस्थानमध्ये दोन जण अवैधरित्या घुसल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, पकडलं जाण्यापूर्वी दोन्ही आरोपी सुमारे आठ तास शाहरुख खानच्या मेकअप रूममध्ये लपून बसले होते. (two men arrested to illegaly entering shah rukh khan mannat bunglow to meet him)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण साहिल सलीम खान आणि राम सराफ कुशवाह अशी आरोपींची नावं आहेत. दोघेही गुजरातमधील भरूचचे असून ते ‘पठाण’ अर्थात शाहरुख खानला भेटण्यासाठी आले होते, असा दावा केला आहे. मन्नतच्या सुरक्षा रक्षकांनी दोघांनाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल आहे. या आरोपींविरुद्ध आता आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्नतमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही आरोपी तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. तिथे शाहरुखच्या मेकअप रुममध्ये घुसले आणि लपले. बऱ्याच वेळानंतर शाहरुखने त्यांना पाहिलं तेव्हा धक्काच बसला. मुंबई पोलिसांनी सांगितल की, हे दोन्ही आरोपी शाहरुख खानला भेटण्यासाठी बंगल्यात घुसले होते आणि सुमारे आठ तास मेकअप रूममध्ये त्याची वाट पाहत राहिले. तपासादरम्यान, दोघेही पहाटे तीनच्या सुमारास दोघेही बंगल्यात घुसले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांना पकडण्यात आलं होतं.
शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत घुसले दोन तरूण
शाहरुखच्या बंगल्याची मॅनेजर कॉलीन डिसूझा यांनी सांगितलं की, सुरक्षा रक्षकांनी त्यांना २ मार्चला सकाळी फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. तसंच बंगल्यात दोन लोक घुसल्याचे सांगितले. एफआयआरनुसार, दोन्ही आरोपींना प्रथम हाऊसकीपिंग कर्मचारी सतीशने पाहिले होते. या दोघांना पाहून शाहरुख खानही थक्क झाला. यानंतर मन्नतच्या सुरक्षा रक्षकांनी दोघांनाही वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन्ही आरोपींनी मन्नतची बाहेरील भिंत उचकटून बंगल्यात प्रवेश केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT