किरण गोसावीला अटक कऱण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं लखनऊला रवाना झाली आहेत. किरण गोसावी हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातला पंच आहे. तो इतके दिवस गायब होता. प्रभाकर हा रविवारी समोर आल्यानंतर किरण गोसावीनेही फोनवरून प्रतिक्रिय दिली आहे. त्यानंतर आता किरण गोसावीला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं लखनऊ या ठिकाणी त्याला अटक करण्यासाठी गेली आहेत. किरण गोसावीचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे उत्तर प्रदेशातील फतेहपूर या ठिकाणी होतं हेदेखील पोलिसांनी कन्फर्म केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाला किरण गोसावी?
सहा तारखेपर्यंत मी मुंबईत होतो. त्यानंतर मला मोठ्या प्रमाणावर धमक्यांचे फोन येऊ लागले. मला ठार करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे मी नाईलाजाने फोन बंद केला. 6 ऑक्टोबरला ही केस पूर्णपणे ओपन झाली त्यावेळी मला हे समजलं की माझ्याविरोधात जी फसवणुकीची केस आहे ती पण ओपन झाली आहे. त्यासंदर्भात जेव्हा मी पुण्याला जात होतो त्यावेळीही मला फोन आला. फोनवर हे सांगण्यात आलं की तुला अरेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुला कुणीही वाचवणार नाही. तुला कुणीही सोडणार नाही. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की पुण्यात जाऊन सरेंडर करण्यात काही अर्थ नाही. त्यानंतर माझा जीव वाचावा म्हणून मी राज्याबाहेर गेलो. जे काही मी लिहून दिलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी कोर्टात बोलेन.
पुण्यात माझ्याविरोधात एक केस सुरू आहे. त्यासंदर्भात मला राज्यात सरेंडर व्हायचं आहे. त्यासाठी माझ्याविरोधात लुक आऊट नोटीसही काढण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वीची केस पुन्हा ओपन केली गेली आहे. पण मला काहीही त्रास नाही त्याचा. प्रभाकर साईल करत असलेले सगळे आरोप खोटे आहे. मी कुणाकडेही 25 कोटी रूपये मागितलेले नाहीत.
प्रभाकर साईलने जे आरोप केले आहेत ते जरा तपासून बघा. त्याच्यासोबत दोन भाई होते. त्यांनी जबरदस्तीने व्हीडिओ शूट केले. तो करत असलेल्या आऱोपांना काही अर्थ नाही असंही किरण गोसावीने म्हटलं आहे. मला काही फोन धमक्यांचे येत आहेत तर काही फोन ऑफर देणारे येत आहेत.
Exclusive : मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, त्यांना टीव्हीवर पाहिलं आहे-के.पी. गोसावी
माझे कॉल रेकॉर्ड आणि फोन ट्रेस केले जात होते. त्यामुळेच मी फोन बंद केला आणि महाराष्ट्रातून लखनऊला आलो. मी स्वतःचा जीव वाचावा म्हणून हे सगळं केलं. आता महाराष्ट्रात जाण्यासाठीचे माझे सगळे मार्ग बंद झाले आहेत त्यामुळे मी स्वतःला जवळच्या पोलीस ठाण्यात सरेंडर करू इच्छितो. मी एनसीबीलाही फोन केला होता. त्यांनाही कल्पना दिली होती की मला धमक्या देणारे फोन येत आहेत. मात्र त्यावेळी त्यांनी लक्ष दिलं नाही. पुण्यात संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडूनही प्रतिसाद आला नाही.
प्रभाकर साईलला पैसे देण्यात आले आहेत. नवाब मलिक यांनी हे पैसे पाठवले आहेत तसंच नवाब मलिक यांच्या लहान भावांचा या सगळ्यामध्ये समावेश आहे. मी माझ्या फोनसहीत शरण येऊ इच्छितो.
ADVERTISEMENT