आम्हाला हवं आमच्या हक्काचं आरक्षण -उदयनराजे

मुंबई तक

• 11:15 AM • 28 Jan 2021

दुसऱ्या कुणाचं हिरावून नाही तर आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. काम नसल्याने मराठा समाजातील मुलांची लग्न होत नाहीत. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे असाही आरोप उदयनराजेंनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात आता राजकारण शिरले आहे ते आता पुरे झाले. माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांनी मराठा […]

Mumbaitak
follow google news

दुसऱ्या कुणाचं हिरावून नाही तर आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. काम नसल्याने मराठा समाजातील मुलांची लग्न होत नाहीत. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे असाही आरोप उदयनराजेंनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात आता राजकारण शिरले आहे ते आता पुरे झाले. माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी आता पुढाकार घ्यायला हवा असं म्हणत उदयनराजेंनी नाव न घेता शरद पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेतृत्व करावं असं सुचवलं आहे.

हे वाचलं का?

आज साताऱ्यात नरेंद्र अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनची स्थापना कऱण्यात आली. या कार्यक्रमात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकाच मंचावर होते. या कार्यक्रमात मराठा आरक्षण कुणाचं हिरावून नको तर हक्काचं द्या अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. मराठा समाजाच्या मागण्या काय आहेत त्याचाही विचार केला गेला पाहिजे. दुसऱ्या कुणाचंही हिरावून आम्हाला आरक्षण नको. त्यांना न्याय दिल्या मग आमच्यावर अन्याय का? एवढं आंदोलन सुरु असतानाही काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आत का? ते माहित नाही असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले उदयनराजे?

“आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी भूमिका याआधी वारंवार मांडली आहे. मराठा समाजाबाबत भेदभाव करणं लोकप्रतिनिधींना शोभत नाही. सगळ्या मतदारसंघांमध्ये मराठा समाज आहे ना? मग आमच्यावर हा अन्याय का? आम्हाला कुणाच्या ताटातलं आरक्षण हिरावून काहीही नको. मराठा समाजातील मुलांना जास्त मार्क मिळाले असतील आणि त्यापेक्षा कमी मार्क मिळालेल्या मुलांना संधी मिळत असेल तर हा अन्याय नाही का?” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच सुप्रीम कोर्टात वकील वेळेवर उपस्थित नसतात हे ते मुद्दाम करतात का? असा प्रश्न मला पडतो असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. लोकांच्या संयमाचा उद्रेक झाला तर ते थांबणार नाहीत ही गोष्ट विसरु नये असंही उदयनराजेंनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं.

    follow whatsapp