“खोके क्रांतीत अजय आशर यांचा मोठा हातभार”, एकनाथ शिंदेंना विरोधक नागपुरात घेरणार?

मुंबई तक

05 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:36 AM)

केंद्रातील नीति आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन नियोजन संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक अजय आशर यांची नियुक्ती करण्यात आलीये. महाविकास आघाडीच्या काळात अजय आशर यांना भाजपनं एकनाथ शिंदे यांचे फ्रंट मॅन म्हटलं होतं. त्यावरच बोट ठेवत आता ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना हिवाळी अधिवेशनात घेणार असल्याचा इशारा […]

Mumbaitak
follow google news

केंद्रातील नीति आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन नियोजन संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक अजय आशर यांची नियुक्ती करण्यात आलीये. महाविकास आघाडीच्या काळात अजय आशर यांना भाजपनं एकनाथ शिंदे यांचे फ्रंट मॅन म्हटलं होतं. त्यावरच बोट ठेवत आता ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना हिवाळी अधिवेशनात घेणार असल्याचा इशारा दिलाय.

हे वाचलं का?

अजय आशर यांच्या मित्र संस्थेच्या नियुक्तीवरून सामना अग्रलेखात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सामना म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली ती बहुधा या अजय आशर महाशयांसाठीच.”

अजय आशर खोके सरकारचे ‘टेकू’ -उद्धव ठाकरे

अग्रलेखात उद्धव ठाकरे म्हणतात, “महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ, आर्थिक क्षेत्रातील जाणकार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे ‘टेकू’ असलेल्या अजय आशर यांना. अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला. सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावर मग गुवाहाटी”, असं गंभीर विधान सामना अग्रलेखात करण्यात आलंय.

भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावरून जाणार?; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनीच दिले संकेत

“ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होतात. हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्रीच करू शकतात. महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्या आशीष शेलार यांनीच श्रीमान आशर यांच्यावर यापूर्वी हल्ला केला होता. आधीच्या सरकारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर आरोप करताना ‘नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्या खात्याचे सर्व निर्णय हेच आशर महाशय परभारे घेतात,’ असा आरोप भाजपच्या शेलारांचा होता”, असं म्हणत ठाकरेंनी भाजपलाही घेरलं आहे.

शेलारमामा हात चोळत बसले; अधिवेशनातील भूमिकेवरून सामनातून टीका

“आता तर महाराष्ट्राच्या आर्थिक व उद्योग धोरणांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांनी भाजपास न जुमानता घेतले व शेलारमामा हात चोळत बसले. अर्थात विरोधी पक्ष हात चोळत बसणार नाही. तो एकजुटीने सरकारला सळो की पळो करून सोडेल. मुळात महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात या आशर यांचा मोठा आर्थिक हातभारही लागला आहे. त्याच उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्यमंत्र्यांनी आशर यांची प्रतिष्ठापना केली, पण त्यात महाराष्ट्राचे काय भले होणार?”, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Rajan Salvi : नोटिसीनंतर उद्धव ठाकरेंशी काय बोलणं झालं? राजन साळवींची पुढची भूमिका ठरली!

“महाराष्ट्रातून गुजरातेत पळवून नेलेले उद्योग या महाशयांनी पुन्हा परत आणायला हवेत. खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्व समावेशक विकास साधण्यासाठी ‘मित्र’ची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्षपदी मुख्यमंत्री व सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री आहेत, पण हे अजय आशरच ही संस्था चालवतील. कारण आशीष शेलार यांचाच दावा होता की, आशर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे ‘फ्रण्ट मॅन’ आहेत. याबाबत विरोधी पक्षाकडे काही स्फोटक बॉम्ब गोळे आहेत व ते नागपुरात फुटल्याशिवाय राहणार नाहीत”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून दिला आहे.

    follow whatsapp