वीर सावरकर यांच्याबाबत एक वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं. त्यावरून वाद निर्माण झाला. काय गरज होती ते वक्तव्य करण्याची? वीर सावरकर आणि महात्मा गांधी हे कुणाला समजले आहेत का? असा प्रश्न आज उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात उपस्थित केला आणि वीर सावरकर प्रकरणावर भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
Savarkar: सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते, त्यांनी तर…: मोहन भागवत
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
वीर सावरकर यांचे विचार आणि महात्मा गांधी यांचे विचार कधी कुणाला कळले आहेत का? ते पूर्णपणे कधी समजले आहेत का? उद्या ते समोर येऊन विचारू लागले तर उत्तर देता येईल का?. माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही. हिंदुत्व आहे तरी काय? हे कुणी शिकवायाचं, कुणाला शिकवायचं? जेव्हा हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द ते म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ते निडरपणे हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात उभे राहिले होते. 92-93 ला दंगली झाल्या, बाबरी पाडण्यात आल्यानंतर तेव्हा शेपूट घालणारे आज शेपूट आणि छाती काढून सांगत होते. तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा देणारे बाळासाहेब ठाकरे होते कुणी विसरू नये.
आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीय आहे
आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीय आहे. आपले पूर्वज एक होते हे जर मान्य असेल तर विरोधी पक्ष, आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरुन आलेत का? हे मोहनजींना जनतेला मान्य आहे का? सत्तेसाठी संघर्ष नको- भागवत, सध्या जे काही सुरू आहे तुमच्या लोकांची शिकवणी लावा. सत्तेचे व्यसन हा अंमली पदार्थ आहे. अनेक प्रयत्न सरकार पाडण्याचे झाले दोन वर्ष. छापा टाकून काटा काढायचा हे प्रकार जास्त चालू शकणार नाही. देशाचा अमृत महोत्सव. महाराष्ट्र, पंजाब, बंगाल त्यावेळी समोर. ममतांचे आजच्या संघर्षासाठी अभिनंदन.
आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?
दहा हजार कोटी अतिवृष्टी साठी दिले. कोविडसाठी निधी यांचा केंद्राकडे. केवळ टीका म्हणून नाही. आपल्या देशात युवा शक्ती मोठी. त्यांच्या रिकाम्या हाताला काम नाही. तरुण गुन्ह्याकडे का वळतोय? व्यवस्थित ही शक्ती घडवावी लागेल नुसत सत्ता हवी म्हणून होणार नाही अगोदर चूल पेटवा. चीन मधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रची प्रतिमा मलिन करु नका. मराठी भाषा भवन उभे राहणार. संभाजीनगरला संतपीठ. मराठी नाटकाचा इतिहास सांगणारे रंगभूमी दालन, मत्सालय, लष्कराचे संग्राहलय उभे करणार.
लढाई न बघितल्याने स्वातंत्र्याबाबत विस्मरण. सैनिक विपरित हवामानात पहारे देतात. दालनात सैनिक पहारा देतात ते वातावरण अनुभवायला मिळेल. लढ्यात सहभागी नव्हता निदान संग्राहलयात तरी सहभागी व्हा.
ADVERTISEMENT