Shiv Sena chief Uddhav Thackeray has strongly criticized the Shinde-Fadnavis government: नागपूर: यंदाचं नागपूरमधील हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (maharashtra karnataka border dispute) मुद्दा चर्चेत आला आहे. याचविषयी आज विधीमंडळात प्रस्ताव मांडण्यात आला. याच प्रस्तावावर शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जोरदार भाषण करत महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणारा भाग हा केंद्रशासित करावा अशी मागणी विधानपरिषदेत केली आहे. (uddhav thackerays huge demand in legislative council on karnataka border issues stormy criticism on cm shinde)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री सीमावादावर ब्र देखील काढत नाही. त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत या सगळ्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्र शासित करावा. अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:
‘सीमावादाचा विषय सोडवण्याची हिंमत आहे का?’
‘कर्नाटकातील एक इंच आम्हाला नकोच आहे. आम्हाला आमचीच जागा हवी आहे. जी तुम्ही घेतली आहे. त्या महाजन आयोगाने जी काही एक लाइन मारली त्याबद्दल केस फॉर जस्टिसमध्ये लिहलं आहे की, कसा अन्याय झाला आहे. की, कोणती गावं 60-70 टक्के मराठी भाषिक असताना सुद्धा कर्नाटकात टाकली गेली.’
‘हे सगळं त्यात दिलेलं आहे. पण हे सगळं आपण ऐकत चाललो आहोत. विधानसभा बांधतोय, उपराजधानी करतंय.. बेळगावी करतंय. काही त्यातून निष्पन्न होईल असं वाटत नाही. त्यामुळे खरंच आपल्याला या विषयात सोडवणूक करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्याची हिंमत आहे का?’ असा सवाल विचारत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
Raj Thackeray: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला खतपाणी कोण घालतंय?
‘आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी या विषयावर काढलाय का?’
‘ते मुख्यमंत्री बोलतायेत. पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी या विषयावर काढलाय का? बरं हा मुद्दा सोडवणार कोण? हा ठराव नेमका असणार तरी काय? माझं मत हा ठराव असाच असला पाहिजे की, जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत तोपर्यंत हा सगळा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित झालाच पाहिजे. ही मागणी आपण ठरावाद्वारे केली पाहिजे आणि विधीमंडळाकडून केंद्राकडे पाठवली पाहिजे.’ अशी टीकाही यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.
सोलापूरमध्ये कर्नाटक भवन! CM बोम्मई घोषणा करुन थांबले नाहीत… नियोजनालाही लागले
‘कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित करा…’
‘केंद्रशासित करा प्रदेश कारण दरवेळेला हे अत्याचार होतात आम्ही काय करतो फक्त बसेसना काळं फासतो, दोन-चार काचा फोडतो. पण तिकडे आपल्या मराठी माणसांना फरफटत नेलं जातंय, लाठीमार केला जातोय. अगदी बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जायचंय हा ठराव संमत केल्यानंतर ती महापालिका बरखास्त करण्यात आली.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
‘…तर किती ग्रामपंचायती तुम्ही बरखास्त करणार?’
‘आज मी ऐकतोय आपल्या काही गावांमधील ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला आहे. काय करणार आहोत आपण त्यांचं?, त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकणार आहोत का? जसं कर्नाटक सरकारने तिकडच्या महापौरांवर टाकला. मग तुम्ही किती ग्रामपंचायती बरखास्त करणार आहात?’
‘ठराव करणार असाल तर चर्चाचर्वणं करु नका, ते चिंगम चावल्यासारखं तोंड हलवल्यासारखं करुन थट्टा करण्याची गरज नाहीए.’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सीमावादावरुन विधानपरिषदेत सरकारवर चौफेर हल्ला चढवला आहे.
ADVERTISEMENT