मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टनरशी कसाबचे संबंध होते असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते, तसंच माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे राईट हँड आहेत, त्यांनी जवळपास १ हजार कोटींचा घोटाळा केला आहे असाही आरोप सोमय्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
हेमंत करकरेंची हत्या कुणी केली? असाही प्रश्न किरीट सोमय्यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित व्यावसयिकांचे हेमंत करकरे यांच्या हत्येसी संबंधित लोकांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
मी फार जबाबदारीने जाणीवपूर्वक सांगतो आहे की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोहचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या भागीदारांचे संबंध कसाबपर्यंत आहेत. त्यांचे संबंध कसाबचं कटकारस्थान करणाऱ्या लोकांपर्यंत आहेत. उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार यांच्याशी संबंध असणाऱ्यांचा संबंध हेमंत करकरेंच्या हत्येशी आहे. असा अत्यंत गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
आणखी काय म्हणाले किरीट सोमय्या?
हेमंत करकरे यांची हत्या दोन कारणांनी झाली. ही हत्या कसाबच्या सहकाऱ्यांनी आणि पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांनी केली. मात्र हेमंत करकरे यांचा मृत्यू बुलेटप्रुफ जॅकेट बोगस असल्याने झाला. त्या बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा विमल अग्रवाल याने केला होता. त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमल्या पण विमल अग्रवालला अटक झाली. असंही किरीट सोमय्यांनी सांगितलं ज्या विमल अग्रवालला बोगस बुलेटप्रुफ जॅकेट प्रकरणात अटक झाली त्याचं नाव यशवंत जाधव यांच्या मालमत्तेवर धाडी टाकल्या तेव्हाही पुढे आलं होतं. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे राईट हँड आहेत.
ADVERTISEMENT