राज्य सरकारने लसींचे पुरेसे डोसच उपलब्ध नसल्याने आणि नव्या डोसचा पुरवठाही मिळत नसल्याने 1 मेपासूनची लसीकरण मोहिम तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वीच 18 ते 44 वयोगटासाठीचं लसीकरण करता येत नसल्याचं सांगितलं होतं. परंतू महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री लसीकरणाबद्दचा नवा प्लान जाहीर करतील असे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी फेसबूक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत.
ADVERTISEMENT
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना 1 मेपासूनच्या लसीकरणासंदर्भात महत्त्वाचे सुतोवाच केले. ते म्हणाले, “1 मेपासून महाराष्ट्रदिनी लसीकरण सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल.”
नोंदणीनंतर ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. सुरवातीला जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल. त्यामुळे नोंदणी केलेल्यांनीच लसीकरण केंद्रावर जावं. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
1 मेपासून लसीकरणाच्या नियोजनाबद्दल आरोग्य मंत्री पुढे म्हणाले, “आम्ही सिरमला पत्र लिहिलं होतं. त्यांनी सांगितलं मे महिन्यात १३ ते १४ लाख लसीचे डोस देऊ. भारत बायोटेक कोवॅक्सिनचे ४ ते साडेचार लाख डोस देऊ शकेल. दोघांची बेरीज १८ लाखांपर्यंत जाईल. त्यादृष्टीने १८ ते ४४ वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करू शकलो, तर ते करता येऊ शकेल. पण एक नक्की आहे की केंद्र खूप कमी ठेवले, तर जास्त कालावधीसाठी लसीकरण सुरू राहील.”
कोरोनाची दुसरी लाट येण्याआधीच ICU बेडस ते ऑक्सिजनचे प्लांट उभारणारा IAS अधिकारी
1 मेपासूनच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाकडे चाचपणी सुरू केलीय. आज संध्याकाळी फेसबूक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री लसीकरण मोहिमेची सर्व माहिती देतील, असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
ADVERTISEMENT