deepak sawant join shinde group : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पक्षात एका मागून एक इनकमिंग सूरू आहे. नुकताच माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे सुपुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी पक्षात प्रवेश केला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखीण एका नेत्याने शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत (deepak Sawant) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या सततच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गट दिवसागणिक मजबूत होत चालला आहे.या पक्षप्रवेशाचा फायदा शिंदे गटाला निवडणूकीत होणार आहे. (udhhav thackeray former health minister deepak sawant will join shinde group)
ADVERTISEMENT
ठाकरे गटाकडून शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेण्यात आले होते. आणि ते शिंदे गटाला मिळाले होते. यामुळे ठाकरे आधीच पक्षपातळीवर संघर्ष करत असताना आता त्यांना एका मागून एक धक्के बसत आहेत. एकीकडे शिवसेना जनतेत जाऊन शिवगर्जना अभियान राबवत असताना, दुसरीकडे ठाकरे गटाला गळती लागली आहे. एका मागून एक नेते शिंदेच्या गळाला लागत आहेत.
Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात उलथापालथ होणार? 10 मुद्दे
दीपक सावंत यांचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटाचे नेते आणि माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत (deepak Sawant) यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केला आहे. सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश करून शिवसेनेचे सदस्यत्व स्विकारले आहे. याआधी उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.ठाकरे गटाला हा सर्वांत मोठा धक्का होता.
Shiv Sena : भाजप-शिंदेंसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
बाळासाहेब माझे देव आहेत. आणि एकनाथ शिंदे हिंदूत्वच्या विचारांना पुढे नेत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर माझा विश्वास आहे. शिंदेंसोबत आधी काम केलंय, म्हणून त्यांच्यासोबत मी उभं राहीन. एक सामाजिक कार्यकर्ता असल्याने मी शिंदेंपासून प्रेरीत असल्याचेही पक्षप्रवेशानंतर भूषण देसाई (Bhushan Desai) म्हणाले आहेत.
Maharashtra Political Crisis : “ठाकरेंनी राजीनामा देऊन राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवला”
दरम्यान राज्यात जुनमध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केली होती. शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटीत दाखल झाले होते. आणि गुवाहाटीतूनच त्यांनी शिवसेना पक्षावर दावा ठोकत भाजपसोबत राज्यात सत्तेत येण्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर मोठा संघर्षही झाला होता.मात्र नंतर पुढे जाऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, आणि ते सत्तेवर आले होते. या शपथविधीनंतर ठाकरे गटाच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील निवडणूक आयोगाने काढून घेतले होते आणि ते शिंदे गटाला मिळाले होते. दरम्यान शिंदे गट सत्तेत आल्यापासून पक्षपातळीवर मजबूत होत चालली आहे.
ADVERTISEMENT