रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे व्लादिमिर पुतिन यांची मालमत्ता गोठवण्याचे ब्रिटन सरकारचे आदेश

मुंबई तक

• 02:39 AM • 26 Feb 2022

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे ब्रिटन सरकारने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची सर्व मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत. AFP ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. रशियाने गुरूवारी युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर लष्करी कारवाईही सुरू केली. गुरूवारी दिवसभर हे हल्ले सुरूच होते. UK government ordered all assets of President Vladimir Putin and his Foreign […]

Mumbaitak
follow google news

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे ब्रिटन सरकारने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची सर्व मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत. AFP ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. रशियाने गुरूवारी युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर लष्करी कारवाईही सुरू केली. गुरूवारी दिवसभर हे हल्ले सुरूच होते.

हे वाचलं का?

रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष टीपेला तर पोहचलाच. त्यानंतर रशियाने युक्रेनवर हल्लाही केला आहे. युक्रेनला मदत करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही हात वर केले आहेत. शुक्रवारची सकाळ उजाडली तीच स्फोटांच्या आवाजाने. स्फोटांनी युक्रेनची राजधानी कीव हादरली आहे. आत्तापर्यंत युक्रेनमध्ये 137 जणांचा मृत्यू झाला आहे तर 316 जण जखमी झाले आहेत असं शुक्रवारी समोर आलेल्या माहितीनुसार कळतं आहे.

रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये खळबळ माजली आहे. युक्रेनची राजधीना कीवमध्ये लोक सैरावैरा पळत असल्याचं चित्र आहे. तसंच एकच हलकल्लोळ उडाला आहे. रशियन सैन्याने चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा रशियन सैन्याने ताबा घेतला तेव्हा चेर्नोबिल प्लांटमधील कर्मचार्‍यांना ओलिस ठेवण्यात आले होते. या हालचालींना अमेरिकेने चिंताजनक म्हटले आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, राजधानी कीव आणि इतर प्रमुख शहरे ताब्यात घेण्याचा आणि शेवटी अधिक अनुकूल सरकार स्थापन करण्याचा रशियाचा हेतू असू शकतो.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ब्रिटन सरकारने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची सर्व मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे युक्रेन आणि रशियामधला वाद?

1991 ला सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर युक्रेन हा स्वतंत्र देश झाला. युक्रेन हा युरोपमधला दुसरा मोठा देश ठरला आहे. या देशात मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन आहे. तसंच या देशातल्या उद्योग व्यवसायही भरभराटीला आलेला आहे. युक्रेनच्या पश्चिमी भागात आपल्या देशाबाबत जबरदस्त अभिमान आहे. तर युक्रेनमध्ये रशियन बोलणारे लोक अल्पसंख्याक गटात मोडतात. मात्र त्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

2014 मध्ये रशियाला झुकतं माप देणारे युक्रेनचे राष्ट्रपती व्हिक्टर यानुकोविच यांच्या विरोधात युक्रेन सरकारमध्ये बंडाळी माजली होती. रशियाने नेमकी हीच संधी साधली. त्यानंतर रशियाने क्रिमियावर कब्जाही केला होता. हा संघर्ष बराच काळ चालला. व्हिक्टर यांना जनआंदोलनांपुढे आणि संघर्षापुढे हार पत्करावी लागली. मात्र तोपर्यंत रशियाने क्रिमियाला तोपर्यंत आपल्या देशात विलिन करून घेतलं होतं. या घटनेनंतर युक्रेन पश्चिमी युरोपसह आपले संबंध चांगले कसे होतील याचे प्रयत्न करत आहे. मात्र रशिया याचा सातत्याने विरोध करतो आहे. त्यामुळेच युक्रेन रशिया आणि पश्चिम युरोपमधील देशांच्या संघर्षात अडकला आहे.

    follow whatsapp