राजकीय पक्ष चर्चेत राहण्यासाठी नेहमीच कोणते ना कोणते फंडे आजमावत असतात. सध्या राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत पुणे शहरात काँग्रेस पक्षाने आयोजित केलेला मोफत छत्री दुरुस्ती कार्यक्रम हा चर्चेचा विषय ठरतो आहे. काँग्रेसच्या या उपक्रमाला सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
ADVERTISEMENT
पावसाळ्यात छत्री ही सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशी गोष्ट मानली जाते. परंतू पावसाळा संपला की बऱ्याचदा ही छत्री आपण माळ्यावर ठेवून देतो. अशावेळी अनेकदा ही छत्री खराब होते किंवा त्यात बिघाड होतो. अशा परिस्थितीत सामान्य जनतेची नस पकडत काँग्रेसने पुण्यात छत्री दुरुस्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय.
महत्वाची गोष्ट म्हणजे हा छत्री दुरुस्तीचा उपक्रम मोफत असून इथे भाजपने दिलेल्या छत्रीचीही मोफत दुरुस्ती करण्यात आली आहे. लॉकडाउन काळात हातावर पोट असणाऱ्या अनेक व्यक्तींचा रोजगार तुटला आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला पुणे शहरासह सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय.
ADVERTISEMENT