योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी आता लवकरच ‘ग्रॅज्युएट’ होणार आहे. नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना अरुण गवळी याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात बीए चा अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असून डॉन सध्या बीए च्या अंतिम वर्षांत असून, अरुण गवळीने दोन पेपर दिल्यास तो बीए ग्रॅज्युएट होणार आहे. बीए अंतिम वर्षाचे पाच पैकी 3 पेपर त्याने पास केले असून 16 जुलै रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
गवळी जेल मध्ये मन लावून आपला अभ्यास करत आहेत. अभ्यासात त्याला काही अडचणी आल्यास त्या तो एखाद्या विद्यार्थी प्रमाणे विचारतो अशी माहिती इग्नूचे डायरेक्टर पी शिवस्वरुप यांनी दिलीय.अरुण गवळी मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.शिक्षणासाठी त्यानं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात बीएच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलाय. सध्या अरुण गवळी बीएच्या अंतिम वर्षात आहे आणि त्याने दोन पेपर पास केल्यानंतर तो बीए ग्रॅज्युएट होणार आहे.यापूर्वी ऑगस्ट 2018 मध्ये अरुण गवळी याने नागपूर जेल मध्ये असतांना गांधी विचार मंच च्या परीक्षेत टॉप केलं होतं.. 80 पैकी 74 गुण त्याने प्राप्त केले होते.
कोण आहे अरूण गवळी?
अरूण गवळी हा कुख्यात डॉन आहे. 80 आणि 90 च्या दशकात अरूण गवळीची मुंबईत दहशत होती. मध्यप्रदेशातल्या खंडवा येथून अरूणचे वडील गुलाब गवळी हे मुंबईत आले होते. घरातली आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अरूण गवळीने शाळा सोडली. वडिलांना मदत व्हावी म्हणून अरूण गवळी सुरूवातीला दूध विकण्याचंही काम करत होता. मात्र 1980 मध्ये रामा नाईक गँगशी अरूण गवळी जोडला गेला. त्यानंतर तो दाऊदसाठी काम करत होता.
1993 मध्ये जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा अंडरवर्ल्डचं सगळं समीकरणच बदललं. बॉम्बस्फोटाच्या आधीच दाऊद दुबईत पळून गेला. दाऊद आणि छोटा राजन वेगळे झाले. छोटा राजनने त्याचा व्यवसाय मलेशियात सुरू केला. यानंतर अरूण गवळीने त्याचं गुन्हेगारी साम्राज्य मुंबईत उभं केलं. सुरूवातीला अरूण गवळीने त्याचा सगळा कारभार दगडी चाळीतून सुरू केला. अरूण गवळीला त्या काळी शेकडो गुंड येऊन मिळाले. त्यानंतर गुंड अरूण गवळीचा डॉन अरूण गवळी झाला. आता या अरूण गवळीला जामसंडेकर हत्या प्रकरणात शिक्षा झाली आहे. आता अरूण गवळी BA होणार आहे.
ADVERTISEMENT