पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी १२ वाजल्याच्या दरम्यान काही अज्ञात मारेकऱ्यांनी एका तरुणावर गोळीबार करत त्याची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारेकऱ्यांनी यावेळी ६ गोळ्या झाडत तरुणाला रक्ताच्या थारोळ्यात जागेवर पाडल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
संबंधित हल्ला नेमका कोणत्या कारणावरुन झाला याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. चंद्रभागा हॉटेल समोर घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबार करुन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी दिली.
पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक या घटनेचा तपास करत आहे.
ADVERTISEMENT