केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज ११ वाजता संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करतील. सामान्य करदाते आणि शेतकरी वर्गाला या अर्थसंकल्पाकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. याचसोबत आजपासून सर्वसामान्यांच्या दैनंदीन आयुष्यात निगडीत असलेल्या काही महत्वाच्या गोष्टींमध्येही बदल होणार आहेत.
ADVERTISEMENT
हे बदल काय आहेत आणि याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे आपण जाणून घेऊयात…
१) १ फेब्रुवारीपासून पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक Non EMV ATM मशीनमधून पैसे काढू शकणार नाहीत. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली. ऑनलाईन फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी PNB Non EMV ATM मशीनमधून व्यवहार करता येणार नाहीयेत.
२) दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये बदल करण्यात येतो. जानेवारी महिन्यात या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. पण त्याआधी डिसेंबर महिन्यामध्ये २ वेळा एलपीजीचे दर वाढले होते. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्या घरगुती आणि कमर्शिअल एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. ज्याचा फटका सामान्यांना बसू शकतो.
ADVERTISEMENT