नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भातली माहिती दिली. या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. नाशिकमधल्या घटनेने मन सुन्न झालं आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय घडली घटना?
नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. अशात नाशिकच्या झाकीर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली आहे. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो रूग्णालय परिसरात सगळीकडे परिसरात या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा ते पाऊण तास खंडीत झाला होता.
व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं मांढरे यांनी सांगितलं. ऑक्सिजनची टाकी ही एका खासगी कंपनीची आहे. रिफिल करण्यासाठी आणि मेंटेनन्ससाठी टँकर आला होता. त्यात टँकर रिफिल करण्यात आला होता असंही आयुक्तांनी सांगितलं. मात्र विस्कळीतपणामुळे ही घटना घडली असंही मांढरे यांनी सांगितलं. याबाबत सगळी माहिती शासनाला कळवली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ही घटना घडल्यानंतर रूग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहून पोलीसही घटना स्थळी दाखल झाले. आता ऑक्सिजनची गळती रोखण्यात आली आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT