पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया करतं आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे. एवढंच नाही तर उत्तर प्रदेशात ब्राह्मण संमेलन आयोजित करणार आङोत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देणार असल्याचंही सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले रामदास आठवले?
‘पाकिस्तान आपल्या कुरापती काढतो आहेत. या कारवाया थांबवायच्या असतील तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकल करावा लागेल असं अमित शाह म्हणाले होते. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. पाकिस्तानवर आता पुन्हा सर्जिकल करण्याची गरज आहे’ असं आठवले यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानने भारताशी मैत्री करून विकास साधला पाहिजे असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. RPI ऐक्याचा विषय आता संपलेला आहे. अनेकदा प्रयत्न करूनही कोणी एकत्र येत नाही त्यामुळे हा विषय संपला आहे असं रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दलित पँथरला 50 वर्षे होणार आहेत. त्यानिमित्ताने दलित पँथरचे पुनरूज्जीवन करणार आहे.
अमित शाह दोन दिवसांपूर्वी काय म्हणाले?
जम्मू काश्मीरमध्ये हत्या केल्या जात आहेत. एलओसीवर दहशतवाद्यांची घुसखोरी होते आहे. सीमेवर होणारे हे प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला उत्तर देऊ शकतो असं वक्तव्य अमित शाह यांनी म्हटलं आहे. पाच वर्षांपूर्वी जो सर्जिकल स्ट्राईक झाला त्याने एक स्पष्ट संदेश आम्ही पाकिस्तानला दिला की भारत कधीही दहशतवाद सहन करणार नाही.
ADVERTISEMENT