Kolhapur : महाडिकांनी वाटल्या सोन्याच्या अंगठ्या; PM मोदींच्या वाढदिनी दिली अनोखी भेट

मुंबई तक

• 08:25 AM • 18 Sep 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीनं कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये 17 सप्टेंबर रोजी दिवसभरात जन्मलेल्या बालकांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सोन्याच्या अंगठीचं वाटप करण्यात आलं. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर भाजपच्यावतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री १२ पासून आज रात्री १२ वाजेपर्यंत जन्मलेल्या बालकांना सोन्याच्या […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीनं कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये 17 सप्टेंबर रोजी दिवसभरात जन्मलेल्या बालकांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सोन्याच्या अंगठीचं वाटप करण्यात आलं. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर भाजपच्यावतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री १२ पासून आज रात्री १२ वाजेपर्यंत जन्मलेल्या बालकांना सोन्याच्या अंगठ्या प्रदान करण्यात आल्या.

हे वाचलं का?

जवळपास 20 नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट

सीपीआर हॉस्पिटलचहा प्रसूती विभागात सर्वसामान्य महिलांची प्रसूती होते. त्यांनाही पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मिळावा, या उद्देशानं भाजपच्यावतीनं, अंगठी वाटप केल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. जवळपास 20 बालकांना सोन्याची अंगठी भेट म्हणून देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी जन्माला येणं ही आनंदाची बाब आहे. वाढदिवसानिमित्त या बालकांना टोकन ऑफ लव्ह आमच्याकडून देण्यात येतीय, असं महाडिक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७३ वा वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीनं देशभरात सेवा पंधरवडा साजरा केला जातोय. याअंतर्गत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, दिव्यांगांना साहित्य वाटप तसंच सर्वसामान्यांनाही वस्तू वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. कोल्हापुरात भाजपच्यावतीनं दिवसभरात विविध सामाजीक उपक्रम राबवण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्या दातृत्त्वाचा वारसा पुढे चालवण्याच्या हेतुनं भाजपच्यावतीनं सीपीआरमध्ये अभिनव उपक्रम राबवण्यात आला, असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

बालकांना अंगठी तर मातांना ब्लॅकसूट

जिल्ह्यातील कष्टकरी, मध्यमवर्गीय शेतमजूर, वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलांची प्रसूती छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात होते. या महिलांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मिळावा, म्हणून शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून आज रात्री १२ वाजेपर्यंत सीपीआरच्या प्रसूतीविभागात जन्मलेल्या बालकांना सोन्याच्या अंगठीचं वाटप करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवसभरात जन्मलेल्या बालकांना सोन्याची अंगठी आणि मातांना ब्लॅकेटसूचं वाटप करण्यात आलं.

    follow whatsapp