ADVERTISEMENT
लावणी सम्राज्ञी अशी महाराष्ट्रात ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर या महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या लवकरच प्रवेश करणार आहेत
आपल्या अदाकारीने सुरेखा पुणेकर यांनी मराठी मातीतली लावणी सातासमुद्रापार पोहचवली
शाळेची पायरीही न चढलेल्या सुरेखा पुणेकर यांनी पायात घुंगरू बांधले वयाच्या आठव्या वर्षी पारावरच्या तमाशापासून त्यांनी लावणी सुरू केली.
‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्ही सांजा’, ‘कारभारी दमानं’ या त्यांनी सादर केलेल्या लावण्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतल्या.
सुरेखा पुणेकर यांच्यावर प्रविण दरेकरांनी वादग्रस्त शब्दात टीका केली आहे, त्यावरून आता दरेकरांनी माफी मागावी अशी मागणी केली जाते आहे
सुरेखा पुणेकर बिग बॉस मराठीमध्येही झळकल्या होत्या
बैठकीची लावणी हा कला प्रकार त्यांनी अजरामर केला, नवे कलावंतही घडवले, त्यामुळेच त्यांचा उल्लेख लावणी सम्राज्ञी असा केला जातो
सुरेखा पुणेकर यांनीही प्रविण दरेकरांनी माफी मागावी अन्यथा परिणामांना तयार रहावं असा इशारा दिला आहे
ADVERTISEMENT