‘जेलमध्ये जाण्यास तयार, आधी…’, उर्फी जावेदचं चित्रा वाघांना आव्हान

मुंबई तक

• 05:10 AM • 02 Jan 2023

Urfi Javed Latest News : महाराष्ट्रात नवा मुद्दा चर्चेत आलाय, तो म्हणजे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद! नेहमी अतरंगी कपडे परिधान करून फिरणाऱ्या उर्फी जावेदला अटक करण्याची मागणी केलीये. चित्रा वाघांनी थेट पोलीस आयुक्तांकडे (Mumbai CP) लेखी तक्रार केल्यानंतर भडकलेल्या उर्फी जावेदनं थेट चॅलेंज दिलंय. (urfi javed Got angry […]

Mumbaitak
follow google news

Urfi Javed Latest News : महाराष्ट्रात नवा मुद्दा चर्चेत आलाय, तो म्हणजे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद! नेहमी अतरंगी कपडे परिधान करून फिरणाऱ्या उर्फी जावेदला अटक करण्याची मागणी केलीये. चित्रा वाघांनी थेट पोलीस आयुक्तांकडे (Mumbai CP) लेखी तक्रार केल्यानंतर भडकलेल्या उर्फी जावेदनं थेट चॅलेंज दिलंय. (urfi javed Got angry after bjp leader Chitra Wagh filed a police complaint against her)

हे वाचलं का?

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद परिधान करत असलेल्या कपड्यांवरच आक्षेप घेतलाय. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वादाची सुरूवात झाली, ती एका ट्विटने. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडीओ ट्विट केला आणि तिला अटक करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली. त्यावरून उर्फीने लगेच चित्रा वाघांना उत्तर दिलं.

चित्रा वाघांनी चित्रविचित्र कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदवर कारवाई करण्यासाठी थेट मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली आणि लेखी तक्रारही दिली. या तक्रारीत चित्रा वाघांनी उर्फीला चांगलंच सुनावलं आहे.

दिलखेच अदांनी घायाळ करणारी उर्फी जावेद किती घेते फीस?

चित्रा वाघांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतल्यानंतर उर्फी जावेदनं चित्रा वाघांवर टीका केलीये. उर्फीने ट्विट करत आपण तुरूंगात जाण्यासही तयार आहोत, असं म्हणत चित्रा वाघांना एक आव्हान दिलंय.

उर्फी जावेदनं चित्रा वाघांना काय आव्हान दिलं?

‘मला खटले वा हा असला मूर्खपणाच नकोय. जर तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संपत्ती जाहीर केली, तर मी आता तुरुंगात जायला तयार आहे. राजकारणी पैसा कसा आणि कुठून कमावतात हे जगाला सांगा. तसेच तुमच्या पक्षातील काही पुरुष कार्यकर्ते शोषण प्रकरणातील आरोपी आहेत. त्या महिलांसाठी तुम्ही कधी काही करताना दिसल्या नाहीत’, असं म्हणत उर्फी जावेदनं चित्रा वाघांवर पलटवार केला आहे.

उर्फी जावेदला मिळत आहेत बलात्काराच्या धमक्या, सायबर सेलमध्ये तक्रार करत म्हणाली…

चित्रा वाघ यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत काय म्हटलेलं आहे?

“ऊर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल.”

“स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणंघेणं नाही. मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे.”

‘तात्काळ हिला बेड्या ठोका’; चित्रा वाघ चिडल्या, ऊर्फी जावेदही भडकली

“तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल, तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत, याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे”, असं चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.

    follow whatsapp