उत्तराखंडमध्ये रविवारीच्या नैसर्गिक आपत्तीनं अनेक भागांत मोठं नुकसान झालंय. सोमवारी प्रशासनानं बचाव कार्याला वेग दिलाय. अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जातंय. तपोवन प्लांटजळच्या बोगद्यात जवळपास ३७ लोक अडकलेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांच्या मते, आतापर्यंत २०२ लोकांना शोधण्यात आलं असून एकूण १९ मृतदेह सापडलेत.
सध्या तपोवन बोगद्यात मोठ्या पातळीवर बचाव कार्य हाती घेण्यात आलंय. आयटीबीपीच्या मते, दुपारी ४ वाजेपर्यंतच जेसीबीच्या मदतीनं बोगद्यापर्यंत जाण्याचा रस्ता मोकळा केला जाईल. यानंतर बचाव पथकं आणि पोलिस पथकातल्या श्वानाना आत पाठवलं जाईल.
उत्तराखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारच्या आपत्तीमुळे जवळपास २०० लोक बेपत्ता झालेत. लोकांच्या तक्रारी येणं सुरूच आहे. तपोवन प्लांटच्या छोट्या बोगद्यातूनच १२ जणांचा जीव वाचवण्यात यश आलंय. दुसऱ्याही बोगद्यातून मलबा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
ADVERTISEMENT