Vaccine Shortage : मुंबईत शनिवार आणि रविवार शासकीय आणि महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद

मुंबई तक

• 01:43 PM • 09 Jul 2021

पुरेशा लस पुरवठ्या अभावी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 जुलैलाही लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्र आणि लसीकरण केंद्रांवर शनिवारी 10 म्हणजेच 10 जुलैलाही लसीकरण बं राहणार आहे अशी माहिती मुंबई महापालिका जनसंपर्क विभागाने केली आहे. 11 जुलैला रविवार असल्याने नियमित सुट्टी म्हणून लसीकरण बंद राहणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. लसींचा […]

Mumbaitak
follow google news

पुरेशा लस पुरवठ्या अभावी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 जुलैलाही लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्र आणि लसीकरण केंद्रांवर शनिवारी 10 म्हणजेच 10 जुलैलाही लसीकरण बं राहणार आहे अशी माहिती मुंबई महापालिका जनसंपर्क विभागाने केली आहे. 11 जुलैला रविवार असल्याने नियमित सुट्टी म्हणून लसीकरण बंद राहणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत असल्याचंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईला मोठा फटका बसला. दुसरी लाट आता हळूहळू ओसरते आहे. मुंबईत कोरोना रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९६ टक्के झाला आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत मृत्यूही मोठ्या प्रमाणावर झाले आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रभरात कोरोना रूग्णांची संख्या ओसरताना दिसते आहे. मात्र डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका जाणवतो आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेचीही चर्चा आहे. अशात लसीकरण हे सर्वात मोठं आयुध सध्या आपल्या हाती आहे. मात्र लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून होतो आहे. त्यामुळे लसींचा तुटवडा जाणवतो आहे. याआधीही मुंबईत लसींचा तुटवडा जाणवला आहे. महाराष्ट्रातही लसींचा तुटवडा याआधी जाणवला आहे. त्यामुळे तुटवडा जाणवला की पुरेसा साठा येईपर्यंत लसीकरण मोहीम बंद ठेवली जाते. याआधी सोमवारी पुण्यातही लसींचा तुटवडा जाणवला होता त्यामुळे सोमवारी पुण्यातही लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. आता मुंबईत लसींची कमतरता भासते आहे म्हणून लसीकरण शुक्रवारी बंद ठेवण्यात आले होते अशात आता शनिवार रविवारही बंद असणार आहे.

मुंबईतल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा बाकी आहे. त्यामुळे मुंबईत काय किंवा राज्यात काय ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना तो देण्यासाठीचं प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे काही काळ 18 ते 44 या वयोगटासाठीची लसीकरण मोहीम महाराष्ट्रात थांबवण्यातही आली होती. आता लसी या वयोगटालाही उपलब्ध होत आहेत. राज्यात सध्या तीन लसी दिल्या जात आहेत. पहिली आहे कोव्हिशिल्ड, दुसरी आहे कोव्हॅक्सिन आणि तिसरी आहे स्पुटनिक व्ही. स्पुटनिक ही रशियाची लस आहे. कोव्हिशिल्ड या लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्युट आणि ऑक्स्फोर्डने केली आहे. तर कोव्हॅक्सिन ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे या लसीची निर्मिती भारत बायोटेकने केली आहे.

    follow whatsapp