मुंबईत 23 मे रोजी अर्थात रविवारी एकाही लसीकरण केंद्रात लसीकरण केलं जाणार नाही अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. 24 मे म्हणजेच सोमवारच्या लसीकरणाची माहिती रविवारी देण्यात येईल असंही महापालिकेन स्पष्ट केलं आहे. मुंबई प्रमाणेच ठाण्यातल्याही सर्व लसीकरण केंद्रांवर रविवारी म्हणजेच 23 मे रोजी लसीकरण बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं ठाणे महापालिकेने म्हटलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सर्वाधिक लसीकरण झालं आहे. सुमारे 2 कोटीहून जास्त लसी महाराष्ट्रात देण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई आणि ठाण्यात रविवारी लसीकरण बंद असणार आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात Lockdown वाढणार, 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण तूर्तास स्थगित-राजेश टोपे
या आधी 15 आणि 16 तारखेलाही म्हणजेच गेल्या आठवड्यातल्या शनिवार रविवारीही लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे 17 तारखेला म्हणजेच सोमवारीही मुंबईत लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. तौकताई वादळाचा परिणाम मुंबईवर झाला त्यामुळे पाऊस झाला होता त्या अनुषंगाने हे लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस कधी घ्यायचा यावरुन सध्या लोकांमध्ये बराच गोंधळ निर्माण झालाय. एकीकडे महापालिका लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद ठेवत असताना शहरात लसीकरणावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
Black Fungus बाबत डॉ. रवि गोडसे यांनी नेमकं काय म्हटलं आहे ? वाचा सविस्तर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 14 एप्रिलपासून लॉकडाऊनही लावण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 1 जूनच्या सकाळी सात पर्यंत असणार आहे. अशात या कालावधीत जास्तीत जास्त लसीकरण करण्याचं लक्ष्य महाराष्टाने ठेवलं होतं मात्र महाराष्ट्राला लसींचा पुरेसा पुरवठाच झाला नाही. त्यामुळे 18 ते 44 या वयोगटासाठीचं लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. ज्या लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस देण्यावर लसीकरण मोहिमेत प्राधान्य देण्यात आलं आहे. तरीही मुंबईसह महाराष्ट्रात लसींचा तुटवडा भासतो आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात Lockdown वाढणार, 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण तूर्तास स्थगित-राजेश टोपे
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांचा आलेख हा खाली जाताना दिसतो आहे. महाराष्ट्रासाठी ही निश्चितच चांगली बाब आहे. मात्र लस हे मुख्य कवच असताना त्याचा पुरेसा पुरवठा केंद्र सरकारकडून झालेला नाही. 45 वर्षे आणि त्यापुढील वयोगटासाठी केंद्र सरकार लस पुरवते आहे. तर 18 ते 44 या वयोगटासाठी लसी राज्य सरकारं विकत घेणार आहेत. या लसी एकरकमी चेकने घेण्याची तयारीही महाराष्ट्र सरकारने दर्शवली आहे मात्र लसींचं उत्पादन तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही त्यामुळे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी मिळण्यात अडचणी येत आहेत.
ADVERTISEMENT