ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं आज वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून विनोद दुआ दिल्ली येथील रुग्णालयात ICU मध्ये उपचार घेत होते. दुसऱ्या लाटेत विनोद दुआ यांना कोरोनाची लागण झाली होती, ज्यात त्यांची तब्येत खालावली होती.
ADVERTISEMENT
पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीत विनोद दुआ यांनी NDTV, दूरदर्शन आणि अन्य अनेक ऑनलाईन माध्यमांसाठी काम केलं आहे. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे.
विनोद दुआ यांच्यावर रविवारी दिल्लीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विनोद दुवा यांच्या पत्नी पद्मावती यांनाही दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली होती. यानंतर दोघांनाही गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वी पद्मावती यांचं उपचारादरम्यान निधन झालं होतं.
विनोद दुआ हे कोरोनामधून सावरल्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा खालावली होती. विनोद दुआ यांना मल्लिका आणि बकुल अशा दोन मुली आहेत. यापैकी मल्लिका ही स्टँडअप कॉमेडीयन आहे तर बकुल ही clinical psychologist म्हणून काम करते.
ADVERTISEMENT