संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री विदुषी कीर्ती शिलेदार यांचं आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सकाळी त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
यावेळी उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याचं कळतं आहे. दहाव्या वर्षी किर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर आपलं पहिलं पाऊल ठेवलं आणि यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. मागील ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयानाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला होता.
जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले. २०१८ साली पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी संगीत रंगभूमीचं मोठं नुकसान झाल्याची भावना बोलून दाखवली जात आहे.
ADVERTISEMENT