गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील चर्चेत असलेले विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच लग्न करणार आहेत. राजस्थानातील ‘सिक्स सेन्सेस फोर्ट’ या हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे. या लग्न सोहळ्याबद्दल विकी-कतरिनाने कमालीची गोपनियता बाळगली असून, आता लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लोकांसाठी ठरवण्यात आलेल्या नियमांची जोरदार चर्चा होतं आहे.
ADVERTISEMENT
कोरोना काळात सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणेच विकी-कतरिनाने लग्नाला येणाऱ्या पाहुण्यासांसाठी खास SOP तयार केल्याची माहिती आहे. या नियमावलीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. राजस्थानच्या बरवारामधल्या सिक्स सेन्सेस फोर्ट या लॅविश रिसॉर्टमध्ये विकी आणि कॅट लग्न करणारेत. पण या लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांसाठी काय काय नियम आहेत तुम्ही पहाच…
ADVERTISEMENT