पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवसेना उप-नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार आणि नंतर गर्भपात करायला लावल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणात न्यायालयात धाव घेतलेल्या कुचिक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला होता. परंतू या प्रकरणातील पीडित तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. पीडित तरुणीने फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करत आपण कुचिक यांच्यावर गंभीर आरोप करत जीवन संपवत असल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
परंतू पुणे पोलिसांना याबद्दल माहिती कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत संबंधित तरुणीची समजूत काढत तिला कोणतही अनुचित पाऊल उचलण्यापासून रोखलं आहे. हा प्रकार झाल्यानंतर या तरुणीने आणखी एक फेसबूक पोस्ट लिहून कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Pune Crime : शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
शनिवारी 12 मार्चला पीडित तरुणीने फेसबूक व्हिडीओ करत आपण आयुष्य संपवत असल्याचं सांगितलं. कुचिक यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे निराश झाल्याचं सांगत. मी गेल्यानंतर मला न्याय देण्याचा प्रयत्न करु नका, तुमचं हे ऋण मी फेडू शकणार नाही. असं या पीडित तरुणीने सांगितलं. पुणे पोलिसांना याबद्दल कळताच त्यांची या मुलीला व तिच्या वडीलांना बोलवून घेत तिची समजूत काढली.
बलात्कारी रघुनाथ कुचिकला पुणे पोलिसांची साथ – भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप
न्यायालयाने जरीही कुचिक यांना जामीन मंजूर केला असला तरीही यापुढे न्यायलयीन लढाईचे मार्ग उपलब्ध असल्याचं पोलिसांनी या पीडित तरुणीला सांगितलं. तपास अधिकारी मोरे यांनी मुंबई Tak ला पीडित मुलीची तिच्या वडिलांसोबत समजूत काढण्यात आल्याचं सांगितलं.
परंतू या घटनेनंतर पीडित तरुणीने आज पुन्हा एकदा फेसबूक पोस्ट लिहून रघुनाथ कुचिक आपल्याला What’s App मेसेज करुन हिणवत असल्याचं म्हटलं आहे. रघुनाथ कुचिक यांची माणसं आपल्याला वारंवार त्रास देत असून या त्रासाला आपण कंटाळलो आहोत असं तरुणीने म्हटलं आहे. या तरुणीने एका फोन नंबरवरुन आलेले स्क्रिनशॉट जोडत आपल्याला येत असलेल्या धमकीच्या मेसेजबद्दल भाष्य केलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात पुणे पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी अधिक काही बोलण्यास नकार दिला आहे. आरोप करण्यात आलेल्या रघुनाथ कुचिक यांची बाजू मुंबई Tak ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर कुचिक यांनी ‘मी पोलीस तपासात सहकार्य करत असून माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि त्यांचा आदर करतो. ह्या कथित पीडित मुलीने राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या विरुद्ध देखील शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरुन नोंद केली आहे. या दोन्ही प्रकरणात देखील न्यायालयीन कारवाई सुरु आहे. आज फेसबुकवर तरुणीने जे पोस्ट केलेले मेसेज आहेत ते मी मुळीच पाठविलेले नाही. मी ह्या बदनामीबद्दल सायबर विभागात रितसर तक्रार देणार आहे.’ असं कुचिक यांनी मुंबई Tak सोबत बोलताना म्हटलं आहे.
काय आहे हे प्रकरण?
कुचिक यांनी आपल्याशी लग्न करण्याचं वचन देऊन शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. यानंतर आपण गरोदर राहिल्याचं कळताच कुचिक यांनी गर्भपात करायला लावत याबद्दल कुठेही वाच्यता केलीस तर मारुन टाकेन अशी धमकी दिल्याची तक्रार पीडित तरुणीने पुणे पोलिसांत केली होती. ज्यानंतर कुचिक यांच्याविरुद्ध IPC 376 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
कुचिक यांनी तरुणीचे आरोप फेटाळले –
काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुचिक यांनी हे आरोप फेटाळले होते. हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचं डॉ. कुचिक यांनी सांगितलं. 24 वर्षीय तरुणीने आपल्याला फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ओळख वाढल्यानंतर या तरुणीनेच प्रेम संबंधांसाठी पुढाकार घेतला. कालांतराने या तरुणीने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत करारनामा पाठवला. ज्यात तिच्या नावावर एक फ्लॅट, दर महिन्याला 15 हजार रुपये, हे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला जमा करायचे यात दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ करायची असं नमूद केल्याचं कुचिक यांनी सांगितलं होतं.
विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या सोबतीने पतीची हत्या, अपघाताचा बनाव; ४८ तासांत आरोपी अटकेत
ADVERTISEMENT