विधानपरिषद: ‘पाकळ्या मिटून घेण्याचं नवं ऑपरेशन कमळ?’, बोचरी टीका

मुंबई तक

13 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:16 AM)

Dilip Walse-Patil criticism BJP over Operation Lotus: पुणे: शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) आधीच राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोट्स’ (Operation Lotus) सुरू झाल्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी अद्याप काही दिवसांचा अवकाश आहे. मात्र, असं असलं तरीही फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिक मतदारसंघात (Nashik Constituency) जे काही राजकीय […]

Mumbaitak
follow google news

Dilip Walse-Patil criticism BJP over Operation Lotus: पुणे: शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) आधीच राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोट्स’ (Operation Lotus) सुरू झाल्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी अद्याप काही दिवसांचा अवकाश आहे. मात्र, असं असलं तरीही फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिक मतदारसंघात (Nashik Constituency) जे काही राजकीय नाट्य पाहायला मिळालं त्यावरुन भाजपने (BJP) महाराष्ट्रात काँग्रेसला (Congress) दणका देण्यासाठी सॉफ्ट ऑपरेशन लोट्स सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse Patil) यांनी भाजपवर अगदी कमी शब्दात पण प्रचंड बोचरी अशी टीका केली आहे. (vidhan parishad election 2023 a new lotus operation in maharashtra dilip walse Patil criticism bjp over satyajeet tambe issue)

हे वाचलं का?

काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी काल (12 जानेवारी) नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ज्यानंतर राज्याचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याआधी आपण दिलीप वळसे-पाटलांनी केलेली नेमकी टीका आहे ते आधी जाणून घेऊया.

दिलीप वळसे-पाटलांचं बोचरं Tweet

‘भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मही कुणाला दिला गेला नाही.’

‘पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?’ अशा शब्दात वळसे-पाटलांनी ट्विट केलं आहे.

आता दिलीप वळसे-पाटलांच्या या ट्विटचा थेट रोख हा भाजप आणि तांबे कुटुंबीयांवरच आहे. एकीकडे अपक्ष फॉर्म भरल्यानंतरही सत्यजीत तांबे हे आपण महाविकास आघाडीचेच उमेदवार आहोत असं म्हणत असताना दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्याने केलेलं हे ट्विट बरंच काही सांगून जातं.

महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का देणारे बाप-लेक, काय म्हणाले काँग्रेसबद्दल?

भाजपचं महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन लोट्स?

2019 साली राज्यात भाजपने अनपेक्षितरित्या सत्ता गमावल्यापासून येथील नेतृत्वाने ऑपरेशन लोट्सला सुरूवात केली होती. त्यानंतर साधारण सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि राज्यात महाविकास आघाडीच सत्ता जाऊन नवं सरकार सत्तेत आलं.

भाजपला पुन्हा ऑपरेशन लोट्सची काय गरज?

2022 साली राज्यात भाजपची सत्ता जरी अस्तित्वात आली तरी राज्यातील सर्वोच्च पद म्हणजेच मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदेंकडे गेलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) समर्थकांना फार मोठा धक्का बसला. अशावेळी आता राज्यात पुन्हा एकदा आपल्या पक्षाचा खुंटा बळकट करायचा असेल तर एकनाथ शिंदेसाठी पर्याय निर्माण करुन आपली ताकद वाढवणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात घेऊन भाजपने नव्याने पावलं टाकण्यास सुरुवात केली.

ज्याची सुरुवात शिक्षक-पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीने झाल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण याच निमित्ताने काँग्रेसमधील दिग्गज नेते असलेल्या बाळासाहेब थोरातांच्या भाच्याला गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपने केले आहेत. त्यामुळेच आता भाजपने पुन्हा एकदा ऑपरेशन लोट्स सुरू केल्याचा आरोप वळसे-पाटलांनी केला आहे.

नाशिक विधान परिषद: सर्वात मोठी बातमी, सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष फॉर्म

नाशिक पदवीधर मतदारसंघात नेमकं घडलं तरी काय?

नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत तांबे हे इच्छुक होते. असं असताना काँग्रेसने ऐन मोक्याच्या क्षणी सत्यजीत तांबेच्याच वडिलांना म्हणजे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसचं उमेदवार म्हणून जाहीर केलं.

खरं तर गेल्या काही दिवसांपासून सत्यजीत तांबे यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढत चालली होती. त्यामुळेच काँग्रेसने त्यांच्याऐवजी पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांना उमेदवारी देऊ केली होती. पण काँग्रेसच्या या अतंर्गत शह-कटशहाच्या राजकारणासाठी तांबे बाप-लेक हे देखील सज्ज होते. त्यांनी देखील अगदी शेवटच्या एक वेगळी खेळी केली.

खरं तर काल (12 जानेवारी) अगदी उशिरा काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर तांबेंची घोषणा केली होती. त्यांच्यासाठी एबी फॉर्म देखील पाठवला होता. मात्र, सुधीर तांबेनी आपल्या मुलासाठी म्हणजेच सत्यजीत तांबेंसाठी आमदारकी न लढविण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सत्यजीत तांबेंनी थेट अपक्ष फॉर्म भरला. ज्यामुळे काँग्रेसमधील नेमकं राजकारण देखील चव्हाट्यावर आलं.

आता या सगळ्या गोष्टीला भाजपची फूस होती असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा महाराष्ट्रात ऑपरेशन लोट्सचीही चर्चा सुरु झाली आहे.

    follow whatsapp