अमरावतीच्या RFO दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी उप वनसंरक्षक विनोद शिवकुमारला अमरावती पोलिसांनी नागपूर स्थानकावरून अटक केली. अमरावतीतील मेळघाट हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या RFO दीपाली चव्हाण यांनी वन विभागाच्या क्वार्टरमध्ये आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ३२ वर्षीय दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी जी सुसाईड नोट लिहिली आहे.
ADVERTISEMENT
स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी दीपाली चव्हाणांनी लिहलेल्या पत्रात नेमकं काय लिहलं होतं?, पाहा ‘ते’ पत्र
काय आहे सुसाईड नोटमध्ये
विनोद शिवकुमारने मला अत्यंत त्रास दिला. त्यांनी रजा कालावधीत असलेली सुट्टीही मला नाकारली. ऑक्टोबर २०२० मध्ये मी प्रेग्नंट असताना विनोद शिवकुमार यांनी ट्रॅकिंग करायला लावलं. त्यामुळे माझा गर्भपात झाला. त्यानंतरही मला पुरेशी सुट्टी देण्यात आली नाही. विनोद शिवकुमार हे मला रात्री बेरात्री कुठेही भेटण्यासाठी अश्लील भाषेत बोलवत असत. त्यांनी माझं मानसिक आणि आर्थिक नुकसान केलं. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी मला अनेक लोकांसमोर शिवीगाळ केली जात होती. अनेकदा शिवकुमारने मला त्यांच्या संकुलात बोलावलं होतं. ते माझ्या एकटेपणाचा गैरफायदा घेत होते. पण मी त्यांच्या मर्जीनुसार न वागल्याने ते मला शिक्षा देत होते. मागील आठवड्यापासून ते माझ्याशी वाईट शब्दांमध्ये बोलत होते. ज्याचा मला मानसिक त्रास होतो आहे.
Deepali Chavan: महिला अधिकारी दीपाली चव्हाणांची गोळी झाडून आत्महत्या
दीपाली चव्हाण यांनी सुसाइड नोटमध्ये नेमके काय आरोप केले आहेत?
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये असा आरोप केला आहे की, ‘माझ्या आत्महत्येला वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार आणि वन्यजीव विभाग चिखलदरा हेच जबाबदार आहेत.’ या सुसाइड नोटमध्ये विनोद शिवकुमार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
‘विनोद शिवकुमारने मला अत्यंत त्रास दिला आहे. त्यांनी रजा कालावधीतील सुट्टी सुद्धा नाकारली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये मी प्रेग्नंट असताना मला विनोद शिवकुमार यांनी ट्रॅकिंग करवलं गेलं. त्यामुळे माझा गर्भपात झाला. एवढंच नव्हे तर त्यावेळी देखील मला पुरेशी सुट्टी देण्यात आली नाही. तसंच विनोद शिवकुमार हे मला रात्रीबेरात्री कुठेही भेटण्यासाठी अश्लील भाषेत बोलायचे. यावेळी ते माझे मानसिक आणि आर्थिक नुकसान करत होते.’
ADVERTISEMENT