अभिनेत्री अनुष्का शर्माने जानेवारीमध्ये पहिल्या बाळाला जन्म दिला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची मुलगी वामिका आता दोन महिन्यांची झाली आहे. वामिकाच्या जन्मानंतर दोघंही तिच्यासोबत वेळ घालवताना दिसतायत. तर नुकतंच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा वामिकासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाले.
ADVERTISEMENT
विरूष्काचे वामिकासोबतचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अनुष्काने वामिकाला उचलून घेतलंय. तर विराट कोहलीने सर्व बॅगा तसंच सामान उचलून घेतल्याचं दिसतंय. यासोबतच त्याच्या हातात बेबी स्टॉलर देखील आहे. ज्याप्रमाणे विराट वडील होण्याचं कर्तव्य बजावतोय ते पाहून अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
12 जानेवारीला विरुष्काच्या घरात वामिकाचं आगमन झालं. शिवाय विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या रुमबाहेरील नेमप्लेट चर्चेत आली होती. या नेमप्लेटवर विराट-अनुष्कासोबतच चिमुकल्या वामिकाचंही नाव देण्यात आलं होतं. तर दोघांनी वामिका दोन महिन्यांचा वाढदिवसही साजरा केला होता. अनुष्काने वामिकाच्या दुसर्या महिन्याच्या वाढदिवसाच्या केकचा फोटो शेअर केला होता.
दरम्यान अनुष्का आणि विराटने वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांना तशी विनंती देखील केली होती. आम्हाला आमच्या मुलांना सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकवायचं नाही असं विराट आणि अनुष्काने स्पष्ट केलं होतं.
ADVERTISEMENT