अवघी विठाई माझी…संक्रांतीनिमीत्त विठुरायाला भाजीपाला आणि पतंगाची सजावट

मुंबई तक

• 03:29 AM • 14 Jan 2022

संपूर्ण महाराष्ट्रात आज संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात यानिमीत्ताने विठुमाऊलीचा गाभारा भाजीपाला-फळं आणि पतंगाने सजवण्यात आला आहे. संक्रांतीच्या मोसमात बाजारात येणाऱ्या सर्व भाजीपाल्याचा या सजावटीत वापर करण्यात आला आहे. देवाचा गाभारा ,चौ खांभी मंडप,सोळाखांभी मंडप ,हा नानाविवीध ६० प्रकारच्या भाजी आणि फळांनी सजवण्यात आला आहे. यामध्ये गवार ,भेंडी ,फ्लावर […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

संपूर्ण महाराष्ट्रात आज संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात यानिमीत्ताने विठुमाऊलीचा गाभारा भाजीपाला-फळं आणि पतंगाने सजवण्यात आला आहे.

संक्रांतीच्या मोसमात बाजारात येणाऱ्या सर्व भाजीपाल्याचा या सजावटीत वापर करण्यात आला आहे. देवाचा गाभारा ,चौ खांभी मंडप,सोळाखांभी मंडप ,हा नानाविवीध ६० प्रकारच्या भाजी आणि फळांनी सजवण्यात आला आहे.

यामध्ये गवार ,भेंडी ,फ्लावर ,मुळा, गाजर,वांगी ,कोबी,बिट,दोडका,लाल व पिवळी सिमला तसेच तिळगुळ व झेंडू ,शेवंती च्या फुलांची रंगसंगती वापरून आकर्षक आरास करण्यात आली आहे.

भाजीपाल्यासोबत छताला लटकवण्यात आलेल्या पतंगांमुळे आजच्या दिवशी या गाभाऱ्याची शोभा आणखीनच वाढली आहे.

सुमारे दीड टन भाजीपाला आणि फळांनी यंदाची ही सजावट करण्यात आली आहे.

ही सजावट पुण्याचे भक्त ताम्हाणे डेकोरेट्स व साई फ्लोवेर्स यांच्या वतीने करम्यात आली आहे.

या अनोख्या सजावटीत विठुरायाचं हे सावळं रुप त्याच्या भक्तांना अधिकच मोहून टाकत आहे.

आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला भाविक वाण वसा घेण्यासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात येतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात वाण वसा करम्यास बंदी घालण्यात आली आहे मात्र मंदिर दर्शनासाठी खुल ठेवण्यात आले आहे.

    follow whatsapp