–स्मिता शिंदे, जुन्नर
ADVERTISEMENT
जुन्नर तालुक्यातील 14 नंबर येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर आज (24 नोव्हेंबर) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. पतसंस्थेत आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अचानक गोळ्या झाडल्या. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला.
१४ नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे-नाशिक महामार्गालगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात हेल्मेट घातलेल्या व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश केला.
धक्कादायक ! चोरीच्या उद्देशाने स्फोटकं लावून ATM मशिनमध्ये घडवला स्फोट, पैसे घेऊन चोरटे पसार
व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत दोन्ही हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. यामध्ये राजेंद्र भोर हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नारायणगाव नेण्यात येत होते. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन मृत घोषित केले.
दरम्यान, पतसंस्थेवर दरोडा पडल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पतसंस्थेतून चोरट्यांनी किती रक्कम लंपास केली, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
पतसंस्थेच्या सीसीटीव्हीत 2 व्यक्ती हेल्मेट घालून आत आल्याचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
डोंबिवली : पैसे संपलेलं ATM मशिन फोडण्याचा प्रयत्न केला, चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला
एका महिन्यांपूर्वी 21 ऑक्टोबरला शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेवर दरोडा पडल्याची घटना घडली होती. त्यावेळी दरोडेखोरांनी सोनं आणि रोख रक्कम पळवली होती. त्या घटनेला महिना होत नाही, तोच जुन्नरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पतसंस्था, बँकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT