मुंबई: राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण हे प्रचंड वाढत आहेत त्यामुळे आता अनेक रुग्णांना रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनची गरज भासू लागली आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून असणारा या इंजेक्शनचा तुटवडा हा आणखी वाढला आहे. त्यामुळेच आता याबाबत स्वत: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर आता ते स्वत: याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहणार असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
‘आम्हाला दररोज 50,000 रेमडेसिवीर इंजेक्शन्सची आवश्यकता आहे. पण आता आम्हाला केंद्राकडून पुढील दहा दिवसात फक्त दररोज 26,000 एवढ्याच वायल्स देण्यात येणार आहे. त्यामुळे मी केंद्र सरकारला विनंती करतो की राज्यात आणखी इंजेक्शन्सचं वाटप केलं जावं. मी आज त्यांना या संदर्भात पत्र लिहणार आहे.’ अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शनचा मागील अनेक दिवसांपासून तुटवडा आहे. त्यामुळे 12 एप्रिलला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनविषयी महत्त्वाचे आदेश जारी केल्याची माहिती दिली होती.
‘Remdesivir चं उत्पादन कंपन्यांनी दुपटीने वाढवावं, किंमत 1200 ते 1300 रूपये ठेवावी’
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता राज्य सरकारने याविषयी आता काही महत्त्वाचे आदेश जारी केले होते. ज्यापैकी सर्वात महत्त्वाचा आदेश म्हणजे हे इंजेक्शन केवळ 1400 रुपयांच्या (किंमत आणि जीएसटी) आतील किंमतीलाच विकता येणार आहे.
पाहा आरोग्यमंत्र्यांनी रेमडेसिवीरविषयी आरोग्यमंत्र्यांनी काय दिले होते आदेश
सुरुवातीला या इंजेक्शनची विक्री ही 4 किंवा 5 हजार रुपयांना झाली. पण आता हे इंजेक्शन 1400 रुपयांखालीच विकलं गेलं पाहिजे यासाठी त्यावर एफडीएकडून नियंत्रण असणं गरजेचं आहे. असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात रेमडेसिवीरचा स्टॉकिस्ट असणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना त्याच्याकडे मागणी नोंदवावी लागेल. त्यानुसार रेमडेसिवीर पुरविण्यात येईल. या माध्यमातून रेमडेसिवीरचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
जर खासगी हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर स्टॉक नसेल आणि स्टॉकिस्ट देखील हे इंजेक्शन उपलब्ध नसेल आणि रुग्णाला जर ते देणं अत्यंत गरजेचं असेल तर अशावेळी जिल्हा शल्य चिकित्सकाने लोन बेसिसवर रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावे. असंही राजेश टोपे यांनी माहिती दिली होती.
‘रेमडेसिवीर इंजेक्शन काही ‘संजीवनी’ नाही, त्याने मृत्यूदरही कमी होत नाही, फक्त…’
दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड असली तरीही याबाबत एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
‘रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection) हे काही मॅजिक बुलेट नाही की, ते दिल्याने कोरोना (Corona) रुग्ण तात्काळ बरा होईल किंवा यामुळे मृत्यू कमी होतील असंही नाही. आपण त्याचा वापर करतो कारण आपल्याकडे त्याच्यापेक्षा चांगल्या प्रतीचं अँटी व्हायरल औषध नाही.’ असं स्पष्ट मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी व्यक्त केलं आहे.
ADVERTISEMENT