महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचं सरकार असताना शिवसेना गुलाम होती. भाजपने (BJP) दुय्यम दर्जा देऊन सत्तेच्या माध्यमातून शिवसेना (Shivsena) संपवण्याचे प्रयत्न केले असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जळगाव येथे बोलताना केला.
ADVERTISEMENT
शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या खानदेश दौऱ्यावर आहेत. आज जळगावात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना म्हणाले की आपल्या स्वप्नातही नव्हते आपण सत्तेत येऊ, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, तीन तिघाडा होईल असे वाटतच नव्हते कारण मी पुन्हा येईन अशी गर्जना सुरू होत्या. मात्र राजकारणात काहीही घडू शकतं. राजकारण पाण्यासारखं चंचल असतं. राज्यात बदल घडला आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला.
हिंदमाता परिसरात पाणी साचलं त्याला स्मृती इराणी जबाबदार – शिवसेना खासदार राहुल शेवाळेंचा दावा
गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेना सत्तेत होती पण शिवसेना संपवण्याचे प्रयत्न झाले. कायम भाजपने शिवसेनेला दुय्यम स्थान दिलं. मला सदैव असं वाटत होतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. युतीच्या पाच वर्षे सत्तेत असूनही आमचा कोंडमारा होत होता. आम्हाला गुलामाप्रमाणे दुय्यम दर्जा दिला जात होता. सत्तेच्या बळावर भाजप हा पक्ष शिवसेना संपवण्याचे प्रयत्न करत होता. त्यामुळे मला कायम वाटत होते की या राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हायला हवा आणि बाळासाहेबांच्य पुण्याईने शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. यातून शिवसेनेला काही मिळणार नाही परंतू आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतो असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
Shivsena-BJP: वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची-संजय राऊत
जळगाव जिल्ह्यातील आगामी राजकारणाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की या जिल्ह्यात शिवसेनेचे बळ आहे. कोणत्याही पद्धतीने निवडणूक लढण्याची मानसिकता शिवसैनिकांची आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, विधान परिषद आणि लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बळावर जिंकू आण यशस्वी होऊ. जळगावमध्ये शिवसेनेचा आमदार झाला, महापौर झाला आता खासदारही शिवसेनेचा व्हावा अशी शिवसैनिकांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवणार आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे सगळं काही समसमान ठरलं आहे त्याच सूत्राप्रमाणे गोष्टी घडल्या पाहिजेत अशी मागणी लावून धरली होती. यावरून भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले गेले. शिवसेनेने नंतर NDA मधून बाहेर पडत भाजपसोबत देशात आणि राज्यात फारकत घेतली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली. महाविकास आघाडीचे मुख्मयंत्री म्हणून उद्धव ठाकरे कार्यभार पाहात आहेत. मात्र युतीसोबत सत्ता असताना आम्ही गुलाम होतो असं वक्तव्य आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT