Gujarat Vidhansabha Election Vote Share: गांधीनगर: गुजरात विधानसभा निवडणुकीचा (Gujarat Vidhansabha Election) दुसरा आणि अंतिम टप्पा आज (5 डिसेंबर) पार पडला. ज्यानंतर आता एक्झिट पोल (Exit Poll) समोर आला आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या (India Today-Axis my india) एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला (BJP) पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळू शकते. यावेळी भाजपच्या जागा प्रचंड वाढण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या सगळ्यात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. एक्झिट पोलनुसार फक्त काँग्रेसच्या जागाच नव्हे तर त्यांच्या मतांची टक्केवारी देखील कमी होत असल्याचं पाहायला मिळतंय. (what exactly does gujarat exit poll mean is it aam aadmi party got vote share of congress)
ADVERTISEMENT
इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडियाने गुजरातमधील सर्वच म्हणजे 182 विधानसभा मतदारसंघात सर्व्हे केला. ज्याची सॅम्पल साइज 42156 एवढी आहे. या सर्व्हेमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपलं मत भाजपच्या पारड्यात टाकलं आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी ‘आप’च्या मतांची टक्केवारी बरीच वाढण्याची शक्यता आहे.
Gujarat Exit Poll 2022: गुजरात पुन्हा भाजपचं, एक्झिट पोलमधील सर्वात अचूक आकडेवारी
गुजरातमधील मतांच्या टक्केवारीचा संपूर्ण डेटा
जातीनुसार Vote Share
गुजरातमध्ये ओबीसी आणि ठाकोर मतदारांची पुन्हा एकदा भाजपला साथ. तर दलित मतदारांचं काँग्रेसला भरभरुन मतदान केल्याचं पाहायला मिळत आहे. तर कोळी आणि सवर्ण मतदारांनी देखील पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. पण मुस्लिम मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास दाखवला असून भाजपला दूर लोटलं आहे.
याशिवाय लेवा पटेल, कडवा आणि इतर पटेल यांनी पुन्हा एकदा भाजपलाच सत्ता बहाल करण्याचं ठरवलेलं पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत पटेल समाज भाजपवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्याचा भाजपला बराच फटका बसला होता. पण असं असलं तरीही आता मात्र पुन्हा एकदा पटेल समाज भाजपच्या पाठिशी उभा असल्याचं पाहायला मिळत आहे.
ग्रामीण-शहरी भागात कोणाला किती Vote Share
गुजरातच्या या निवडणुकीत भाजपला ग्रामीण आणि शहरी भागात जबरदस्त प्रतिसाद मिळाला असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपला ग्रामीण भागातून 45 टक्के आणि शहरी भागातून 48 टक्के मतदान झाल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून समोर येत आहे.
तर त्यापाठोपाठ काँग्रेसला मतदान झालं आहे. ज्यामध्ये ग्रामीण भागातून 27 टक्के आणि शहरी भागातून 24 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. ज्याचा फायदा आपने उचलला आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. मात्र, यंदा काँग्रेसने गुजरातकडे फारसं लक्ष न दिल्याने आपने तेथील मतदारांना आकर्षित केलं आहे. ज्यामुळे त्यांना ग्रामीण भागातून 20 टक्के आणि शहरी भागातून 21 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुजरात निवडणुकीतील एकूण Vote Share
एक्झिट पोलनुसार गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतदान झाल्याचा पाहायला मिळतंय. एक्झिट पोलनुसार भाजपला तब्बल 46 टक्के झाल्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 26 टक्के आणि आम आदमी पक्षाला 20 टक्के मतदान झालं असल्याचं समोर येतंय. याचा अर्थ या निवडणुकीत भाजपला कोणताही फटका बसलेला नसून काँग्रेसने मात्र आपला बराचसा मतांचा वाटा गमावला आहे.
मागील निवडणुकीत भाजपला काँग्रेसने 99 जागांवरच रोखलं होतं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपने गुजरातचा गड राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते. अशातच काँग्रेसचं गुजरातकडे झालेलं दुर्लक्ष ही बाब लक्षात घेऊन आपने तिथे शिरकाव केला आणि त्याचीच परिणिती म्हणून आता काँग्रेसच्या मतांचा वाटा हा ‘आप’ला मिळत असल्याचं दिसून येतंय.
ADVERTISEMENT