शरद पवार यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर लतादीदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सदिच्छा दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
शरद पवार यांची प्रकृती बिघडली, ब्रीचकँडी रूग्णालयात बुधवारी होणार शस्त्रक्रिया
शरद पवारांना झालंय काय?
शरद पवार यांना काल संध्याकाळपासून त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास आहे हे समजलं. सध्या त्यांची Blood Thinning वर सुरू असलेली औषधं थांबवण्यात आली आहेत. ३१ मार्चला त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात येईल आणि एंडोस्कोपी आणि सर्जरी करण्यात येईल. त्यामुळे त्यांचे पुढचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनीही केलं ट्विट
शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल समजलं, त्यांना लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना मी करतो असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट केलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काय म्हटलं आहे?
आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. काल संध्याकाळी त्यांना पोटात दुखू लागल्याने ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. शरद पवार हे सध्या रक्त पातळ होण्याची औषधं घेत आहेत. मात्र हा त्रास सुरू झाल्यानंतर शरद पवार यांची ती औषधं थांबवण्यात आली आहेत. ३१ मार्चला त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात येईल. तिथे एंडोस्कोपी केली जाईल आणि त्यानंतर शस्त्रक्रिया होईल. शरद पवार यांना हा त्रास सुरू झाल्याने त्यांचे पुढील सगळे कार्यक्रम, दौरे रद्द करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT