सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory Ltd) आणि अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील (appasaheb nalawade sugar factory) भ्रष्टाचार प्रकरणी (Money laundering case) अंमलबजावणी संचालनालयाने (enforcement directorate) बुधवारी (11 जानेवारी) माजी मंत्री (Former Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कोल्हापुरातील (Kolhapur) निवासस्थानासह विविध मालमत्तांवर (properties) छापे टाकले. केंद्रीय तपास यंत्रणेनं (central investigation agency) अर्थात ईडीने (ED) हसन मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांच्या (Hasan Mushrif’s relatives) पुण्यातील (Pune) कार्यालयांवर आणि इतर काही ठिकाणी छापे (Raid) टाकले आहेत. हे प्रकरण नेमकं काय, आरोप काय आहेत, तेच समजून घ्या…
ADVERTISEMENT
भाजपचे नेते नेते किरीट सोमय्या यांनी 2022 मध्ये मुश्रीफ यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली होती. कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात त्यांच्या एका नातेवाईकाच्या मालकीच्या व ताब्यात असलेल्या खासगी कंपनीच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेला आहे.
किरीट सोमय्या यांनी असाही आरोप केला होता की, अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं ताब्यात घेतला होता. या कंपनीचे मालक मुश्रीफांचे नातेवाईक मतीन हसीन मंगोली हे होते. ब्रिक्स इंडियाला कारखाना देताना प्रक्रियेचं पालन केलं गेलं नाही.
Hasan Mushrif : कार्यकर्ता ते कोल्हापुरमधील राष्ट्रवादीचा चेहरा… हसन मुश्रीफ कोण आहेत?
दुसर्या तक्रारीत किरीट सोमय्या यांनी आरोप केलेला होता की, हसन मुश्रीफ हे सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाने 127 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहार आणि मनी लाँडरिंगमध्ये सामील आहेत.
हसन मुश्रीफ मनी लाँड्रिंग केस : अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याचं प्रकरण काय?
अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ताब्यात घेतला. या ब्रिक्स इंडियाची मालकी हसन मुश्रीफ यांचे नातेवाईक मतीन हसीन मंगोली हे बेनामी मालक असल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे. साखर कारखाना 2014 मध्ये लिलावाची कोणतीही प्रक्रियेचं पालन न करता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला 10 वर्षे चालवण्यासाठी देण्यात आला होता.
तक्रारीत म्हटलं आहे की, साखर कारखान्याचे 7,185 शेअर्स एसयू कॉर्पोरेशन या शेल कंपनीकडे आहेत. या कंपनीचा वापर मुश्रीफ यांनी पैसे पार्क (गुंतवणूक) करण्यासाठी केला होता. मंगोली आणि गुलाम हुसेन नावाच्या व्यक्तींकडेही प्रत्येकी 998 शेअर्स आहेत.
Hasan Mushrif: आधी मलिक, नंतर मी विशिष्ट धर्माच्या लोकांवर..: मुश्रीफ
साखर कारखान्याचं 98 टक्के शेअर्स मुश्रीफ कुटुंबीयांकडे असल्याचंही तक्रारीत म्हटलेलं आहे. आरओसीला (Registrars of Companies) कथितपणे साखर कारखाना आणि शेअर्स वितरण पॅटर्न हस्तांतर प्रक्रियेत विसंगती आढळून आली, ज्यातून हे दिसून आलं की, कथित बेनामी होल्डिंग्ज आणि काही शेल कंपन्या शेअर्स ठेवण्यासाठी तयार केल्या गेल्या. मुश्रीफ आणि नातेवाईकांच्या कंपन्याकडून साखर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी प्रक्रियेचं पालन केलं गेलं नाही, त्याचबरोबर कंपनी कायद्याच्या कलमांचंही उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारीद्वारे करण्यात आलेला आहे.
किरीट सोमय्यांचे हसन मुश्रीफांविरुद्ध आरोप काय?
किरीट सोमय्यांच्या म्हणण्यानुसार, मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात भ्रष्टाचाराचे पैसे गुंतवले. 19 व्यक्तींच्या नावाने कारखान्यात गुंतवणूक असून, यात हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबातील अबिद हसन मुश्रीफ, नावीद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला हसन मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ, साहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावे 13,30,49,280 (तेरा कोटी तीस लाख एकोणपन्नास हजार, दोनशे ऐंशी) रुपयांची गुंतवणूक आहे.
Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा
हसन मुश्रीफांनी काळा पैसा पांढरा करून म्हणजे मनी लाँड्रिंग करून शेल कंपन्यांच्या माध्यमातून 78,91,51,830 रुपयांचे या साखर कारखान्याचे शेअर्स घेतलेले आहेत. रजत कंझ्यमुर सर्व्हिसेस प्रा.लि., माऊंट कॅपिटल प्रा.लि., मरुभूमी फायनान्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा.लि., नेक्टजेन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, सरसेनापती शूगर्स अशी या कंपन्यांची नावे असल्याचं सोमय्यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT