गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर मागच्या 28 दिवसांपासून मुंबईतल्या ब्रीचकँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. कोरोना आणि निमोनियाशी त्यांनी झुंज दिली. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. प्रतित समदानी हे आणि त्यांची टीम त्यांच्यावर उपचार करत होते.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत डॉ. प्रतित समदानी?
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मागील 28 दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना कोरोना झाला होता. तसंच निमोनियाही झाला होता. आज मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं आहे. अत्यंत दुःखद अशीही घटना आहे. त्यांची प्रकृती सुधारावी आणि त्यांना आराम मिळावा म्हणून आम्ही शर्थीचे प्रयत्न करत होतो मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. असं डॉक्टर प्रतित समदानी यांनी स्पष्ट केलं आहे.
चित्रपट संगीत आणि भावगीत या दोन महत्त्वाच्या प्रवाहांना अभिजाततेचं परिमाण देत भारतीय जनमानसावर गेली आठ दशकं अधिराज्य गाजवणारा स्वर आज निमाला. गान कोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्या ९३ वर्षांच्या होत्या. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनावर मात केली होती, मात्र त्रास सुरू झाल्यानं त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला निमोनिया झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांना ब्रीचकॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातच त्यांना कोरोनाचा संसर्गही झाला होता. मात्र, औषधोपचाराच्या मदतीने त्यांनी कोरोनावर मातही केली होती. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लता मंगेशकरांनी संपूर्ण कारकीर्दीत 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. ‘आजवर इतका सुरेख आवाज ऐकलेला नाही’, असं म्हणत अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनीही गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वराला दाद दिली होती.
ADVERTISEMENT