ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे अनेक खाती घेतली आहेत. गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती फडणवीसांकडे आहेत.
भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री ही खाती देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण खातं उदय सामंत यांच्याकडे होतं.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे,. महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास हे खातं विखे पाटलांना मिळालं आहे.
भाजप-शिवसेना सरकारमध्ये अर्थमंत्री आणि वनमंत्री म्हणून भूमिका बजावलेल्या सुधीर मुनगंटीवारांना या मंत्रिमंडळात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय हे खातं देण्यात आलं आहे.
आदिवासी भागातून आमदार अससेल्या विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास खातं मिळालं आहे. गावित हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत.
गिरिष महाजन हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजप-शिवसेना सरकारच्या काळातही ते मंत्री होते. आताच्या मंत्रिमंडळात त्यांच्या खांद्यावर ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण ही खाती देण्यात आली आहे.
सुरेश खाडे यांच्या खांद्यावर कामगार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते अतुल सावे यांचाही या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याकडे सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण ही खाती देण्यात आली आहेत.
कल्याण-डोंबीवलीच्या राजकारणातील मोठं नाव आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू रवींद्र चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आली आहेत.
सर्वात श्रीमंत आमदार असलेले मंगलप्रभात लोढा यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास ही खाती देण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT