शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईतल्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या त्या किरीट सोमय्यांवर आणि त्यांचा मुलगा नील याच्यावर. तसंच भाजपवरही त्यांनी टीकेचे बाण चालवले. मात्र त्यांचा प्रमुख रोख दिसून आला तो किरीट सोमय्यांवरच. किरीट सोमय्यांचा उल्लेख त्यांनी मुलुंडचा दलाल असाही केला. तसंच त्यांना शिवसेना स्टाईल काही शिव्याही दिल्या. अशात किरीट सोमय्या हे मंगळवारीच दिल्लीला गेले होते. आता आज संजय राऊत यांच्या आरोपांना ते उत्तर देणार आहेत.
ADVERTISEMENT
मुलुंडच्या ‘त्या’ दलालाला जोड्याने मारू; संजय राऊत किरीट सोमय्यांवर भडकले
आज सकाळी साडेनऊ वाजता किरीट सोमय्या दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते संजय राऊत यांच्या आरोपांना काय उत्तर देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे असं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजतं आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या हे संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत.
किरीट सोमय्यांनी केलेलं ट्विट काय आहे?
2017 मध्ये संजय राऊतने अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी माझी पत्नी प्रा डॉ मेधा सोमैयाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता
आता माझा मुलगा नील सोमय्याचं नाव घेतलं आहे. ठाकरे सरकारच्या नेत्यांनी माझ्याविरुद्ध 10+३ खटले/चौकशी दाखल केले आहेत
आम्ही भ्रष्टाचार केला नाही, चौकशी करा. असं ट्विट करून किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे. आता आज ते काय बोलणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते किरीट सोमय्यांबाबत?
ईडीच्या धाडी पडण्याआधी मुलुंडचा दलाल पत्रकार घेऊन सांगतो की, संजय राऊतांना अटक होणार आहे. आता ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहे. या व्यक्तीच्या घरी पोहोचणार आहे. हा काय प्रकार आहे. तुमचं सरकार आलं नाही, म्हणून आम्हाला त्रास देता. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला गुडघे टेकवायला शिकवलं नाही, हे विसरू नका.
किरीट सोमय्या हे उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले असल्याचा आरोप करतात. आपण सगळे जण एक दिवस त्या बंगल्यात पिकनिक काढू. जर ते बंगले तुम्हाला दिसले, तर मी राजकारण सोडेन. जर नसतील, तर मुलुंडच्या त्या दलालाला जोड्याने मारू असा इशारा राऊत यांनी सोमय्यांना दिला. दररोज भपंकपणा सुरू आहे. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचं काम सुरू आहे असंही संजय राऊत म्हणाले होते. आता आज याच आरोपांना किरीट सोमय्या उत्तर देणार आहेत.
ADVERTISEMENT